भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

By Admin | Updated: April 20, 2016 02:38 IST2016-04-20T02:38:18+5:302016-04-20T02:38:18+5:30

येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Bhagwan Mahavir Jayanti celebrated with enthusiasm | भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

दर्शनासाठी भक्तांची गर्दी : प्रभातयात्रा, अहिंसा संदेश रॅली, रक्तदान शिबिर
यवतमाळ : येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने शहरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे प्रभातयात्रा काढण्यात आली. अहिंसा संदेश रॅली आणि रक्तदान शिबिर महोत्सवाचे विशेष आकर्षण होते.
स्थानिक माळीपुरा परिसरातील दिगंबर जैन मंदिरात मंगल ध्वजारोहण करण्यात आले. या ठिकाणावरून प्रभातयात्रा काढण्यात आली. ही प्रभातयात्रा माळीपुरा परिसरातून मार्गक्रमण करीत थेट राजेंद्र नगरातील रामचंद्र ज्ञान मंदिरात विसर्जित करण्यात आली. पहाटे ९.३० च्या सुमारास अहिंसा संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही संदेश रॅली स्कूटरवरून काढण्यात आली. बोरा जैन धर्मस्थानकापासून रॅलीस प्रारंभ झाला. वाघापुरातील महावीर जैन मंदिरात रॅलीचे विसर्जन झाले.
जैन सोशल ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आराधना भवनात ७० भक्तांनी रक्तदान केले. याच ठिकाणावरून दुपारी ४ वाजताच्या सुमारास गोरक्षण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता केसरिया भवनात भक्तीसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला.
महावीर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच भगवान महावीरांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. (शहर वार्ताहर)

Web Title: Bhagwan Mahavir Jayanti celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.