उमरखेड शहरात बेटी बचाओ रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:22 IST2018-10-11T22:21:43+5:302018-10-11T22:22:01+5:30
जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून शहरातील चाळीसच्यावर सामाजिक संघटनांनी ‘बेटी बचाओ’ रॅली काढली. या रॅलीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला.

उमरखेड शहरात बेटी बचाओ रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून शहरातील चाळीसच्यावर सामाजिक संघटनांनी ‘बेटी बचाओ’ रॅली काढली. या रॅलीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला.
पुणे येथील बेटी बचाओ आंदोलनाचे राज्य प्रवर्तक डॉ. गणेश राख, डॉ. प्रमोद लोहार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवाड, ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेतून रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी बेटी बचाओचा संदेश देत ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले. शहरातील प्रमुख मार्गानी फिरल्यानंतर ही रॅली नगर परिषद मंगल कार्यालयात आली. तेथे रॅलीचा समारोप झाला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सविता पाचपूरे होत्या. डॉ.गणेश राख, डॉ. प्रमोद लोहार, डॉ. वंदना वानखेडे, डॉ. अरूण बंग, डॉ. सारिका वानखेडे, डॉ. प्रिती जयस्वाल, पीएसआय लता पगलवाड, सविता कदम, उपनगराध्यक्ष अरविंद भोयर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राख यांनी गेल्या दहा वर्षात देशात तब्बल सहा कोटी ३० लाख मुलींचा गर्भातच रक्तपात झाल्याचे सांगितले. शहरातील खासगी डॉक्टरांनी मुलींसाठी मोफत सेवा उपक्रम राबवावा, असे आवाहन डॉ. लोहार यांनी केले. संचालन प्रा. ज्योती काळबांडे, तर आभार शशीप्रभा महामुने यांनी मानले.
रॅलीत महिला आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. इनरव्हील क्लब, रोटरी, पतंजली, वृक्ष संवर्धन समिती, सत्य निर्मिती महिला मंडळ, ब्राम्हण महासंघ, ज्येष्ठ नागरिक समिती, कर्तव्य ग्रुप, उद्देश सोशल फाऊंडेशन, जमाते- ईस्लामी-हिंद, श्रीराम मित्र मंडळ, डॉक्टर असोसिएशन, वकील संघ, वासवी क्लब, जिजाऊ ब्रिगेड आदींसह ४० च्या वर संघटनांचे पदाधिकारी, सदस्य रॅलीत सहभागी झाले होते.