उत्तम पशुधन हीच शेतकऱ्यांची पुंजी
By Admin | Updated: February 27, 2016 02:54 IST2016-02-27T02:54:15+5:302016-02-27T02:54:15+5:30
पूर्वी पशु आणि पक्षीपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा होता. नजीकच्या काळात शेतकऱ्यांचे जोडधंद्याकडे दुर्लक्ष झाले.

उत्तम पशुधन हीच शेतकऱ्यांची पुंजी
पालकमंत्री : कळंब येथे पशु प्रदर्शन, उन्नतीसाठी जोडधंद्याशिवाय पर्याय नाही
कळंब : पूर्वी पशु आणि पक्षीपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा होता. नजीकच्या काळात शेतकऱ्यांचे जोडधंद्याकडे दुर्लक्ष झाले. शेतकरी वर्गाला आर्थिक उन्नती साधायची असेल तर जोडधंद्याशिवाय पर्याय नाही. उत्तम पशुधन हीच तर खरी शेतकऱ्यांची पुंजी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
येथील पशुप्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती वर्षा वासेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, तहसीलदार संतोष काकडे, उपसभापती विजय गेडाम, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, उपनगराध्यक्ष मनोज काळे, पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी, जिल्हा पशुधन उपायुक्त डॉ.किशोर कुंभरे, जिल्हा पुशधन अधीक्षक डॉ.दिलीप सोनकुसळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, २०१९ पर्यंत सर्व गावात जलयुक्त शिवार योजना राबविली जाणार आहे. पर्यायाने सर्व गावात शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. प्रलंबित वीज कनेक्शन तातडीने जोडले जाईल. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आलेल्या आहे. त्याचा फायदा उचलला पाहिजे.
सीईओ डॉ.कलशेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. पशु प्रदर्शन हा त्याचाच एक भाग आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविधांगी प्रयोग केले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्राला ९० टक्केपर्यंत प्राधान्य दिले
जाणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
कार्यक्रमाला बांधकाम सभापती आशिष धोबे, आरोग्य सभापती सुनीता डेगमवार, उपसभापती शैलजा उमरतकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, नगरसेवक मारोती वानखेडे, राजेंद्र हारगुडे, वैशाली नवाडे, विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख रोशन गोरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पशुधन विकास अधिकारी डॉ.रवींद्र मांडेकर यांनी केले. संचालन व आभार सुरेश कठाळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)