बेलोरा आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:20 IST2017-09-03T23:20:43+5:302017-09-03T23:20:59+5:30

बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते पार पडले.

Belarora Health Center Building | बेलोरा आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

बेलोरा आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळ : बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे अध्यक्षस्थानी होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, बांधकाम व अर्थ सभापती निमिष मानकर, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनीताई दरणे, समाज कल्याण सभापती प्रज्ञाताई भुमकाळे, जिल्हा परिषद सदस्य रेणूताई संजय शिंदे, कविताताई किशोर इंगळे, सचिन रवींद्र राठोड, पंचायत समिती सभापती एकनाथराव तुमकर, उपसभापती गजानन पाटील, पंचायत समिती सदस्य कांता संजयराव कावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, सरपंच कल्पना उमेश नेवारे, उपसरपंच रूपाली नीलेश मडावी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रथम अर्थसहाय्य करणारे दशरथ गुघाणे यांच्यावतीने जयंत गुघाणे आणि नीता गुघाणे यांचा तसेच मारोतराव भारती यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विक्रांत शिरभाते, सुनील खडसे आणि कंत्राटदार तुकाराम जाधव यांनाही गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दार्थ मानकर यांनी केले. संचालन सहायक अभियंता विलास चावरे यांनी तर आभार सुनील खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला अंकुर साहित्य संघाच्या अध्यक्ष विद्या खडसे, जिजाऊ फाऊंडेशनच्या सचिव सुवर्णा खात्रे, उपाध्यक्षा दीपा दुधाणे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Belarora Health Center Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.