चक्रवती नदीच्या उत्थानास सुरुवात

By Admin | Updated: May 9, 2016 02:29 IST2016-05-09T02:29:39+5:302016-05-09T02:29:39+5:30

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चक्रवती नदीच्या उत्थानास शनिवारी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

The beginning of the rise of the Chakravati river | चक्रवती नदीच्या उत्थानास सुरुवात

चक्रवती नदीच्या उत्थानास सुरुवात


पुनरुज्जीवन : कळंब येथील नागरिकांनी घेतला पुढाकार
कळंब : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चक्रवती नदीच्या उत्थानास शनिवारी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. लोकसहभाग आणि लोकांनी गोळा केलेल्या निधीतून या कामास अगदी ठराविक वेळेवर सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दिगांबर मस्के होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सदस्य प्रवीण देशमुख, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता काटपल्लीवार, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार संतोष काकडे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, पणन महामंडळाचे संचालक सुरेश चिंचोळकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ.अशोक उईके म्हणाले, या नदीला जिवंत करणे हे माझे स्वप्न आहे. परंतु यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्वाचा आहे. ज्या कामात लोकांचा पुढाकार असतो, ते काम कधीही अयशस्वी होत नाही. त्यामुळे नदीचे पुनरुज्जीवन प्रत्यक्षात साकारले जाईलच, याचा मला ठाम विश्वास आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनीही या चळवळीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत, आपले एक महिन्याचे मानधन जाहीर केले. जिल्हाधिकारी सच्ािंद्र प्रताप सिंह यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
प्रास्ताविकातून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी मांडली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर पडावी, कळंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव जगताप, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, प्रशांत डेहनकर, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कुळकर्णी, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, बांधकाम सभापती आशिष धोबे, आरोग्य सभापती सुनीता डेगमवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनंदा जुमळे, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे, नायब तहसीलदार संजय होटे, राजेश पऊळ, नगरसेवक राजेश मांडवकर, राजेश हारगुडे, वासुदेव दाभेकर, अशोक उमरतकर, मारोती दिवे, अनिल नवाडे, योगेश धांदे, मुरलीधर डेहनकर, भाविक भगत, देवेंद्र जोशी, मारोती वानखडे, हेमंत बोकडे, आर.जी. शिंदे, विजय मेश्राम, राजेश चौधरी, राजाभाऊ तांबेकर, सिध्देश्वर वाघमारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The beginning of the rise of the Chakravati river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.