बीअरबार, वाईनशॉप तपासणीसाठी जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर
By Admin | Updated: August 29, 2014 00:06 IST2014-08-29T00:06:18+5:302014-08-29T00:06:18+5:30
वाईनशॉप, बीअरबारची तपासणी कशी चालते हे सर्वश्रृत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एसपीने स्वत: जाऊन एखाद्या बीअरबारची तपासणी केल्याचे उदाहरण दुर्मिळच आहे. मात्र गुरुवारी

बीअरबार, वाईनशॉप तपासणीसाठी जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर
दारव्हा, आर्णी रोडवर मोहीम : एक्साईज एसपीला कारवाईचे निर्देश
यवतमाळ : वाईनशॉप, बीअरबारची तपासणी कशी चालते हे सर्वश्रृत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एसपीने स्वत: जाऊन एखाद्या बीअरबारची तपासणी केल्याचे उदाहरण दुर्मिळच आहे. मात्र गुरुवारी प्रत्यक्षात यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल हे स्वत:च वाईनशॉप आणि बीअरबारच्या तपासणीसाठी अचानक रस्त्यावर उतरले. त्यांनी आर्णी व दारव्हा रोडवर ही मोहीम राबविली.
जिल्ह्यात ठिकठिकाणी देशी व विदेशी मद्य विक्रीची दुकाने आहेत. याठिकाणी काही गैरप्रकार होतो का याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी अचानक शहरातील मद्य विक्री दुकानांना भेटी दिल्या. दारव्हा मार्गावरील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या सीएल-३ या किरकोळ दारू विक्री दुकानाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आर्णी मार्गावरील एफएल-२ श्री वाईन शॉपची तपासणी केली. त्यानंतर आपला मोर्चा आर्णी मार्गावरील साहिबा नावाच्या वाईन बारकडे वळविला.
तेथे रजिस्टर, नोंद वह्या अद्यावत लिहिले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. लगेच उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी कारवाई केली. महिवाल यांच्या मोहिमेने परवानाधारकांमध्ये धडकी भरली तर नागरिकांना कुतुहल वाटली.
(स्थानिक प्रतिनिधी)