गणपती विसर्जनाला गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST2021-09-21T04:47:37+5:302021-09-21T04:47:37+5:30

मंगेश मिलमिले व छत्रपती घुंगरूड (रा. सालेभट्टी) यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारी गणेश विसर्जन करण्यात ...

Bee attack on devotees who have gone for Ganpati immersion | गणपती विसर्जनाला गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला

गणपती विसर्जनाला गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला

मंगेश मिलमिले व छत्रपती घुंगरूड (रा. सालेभट्टी) यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारी गणेश विसर्जन करण्यात आले होते. गावातील बळीराम लोणसावळे यांच्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात गणेश विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. भजन, दिंडीसह निघालेल्या गणेश विसर्जन रॅलीत गावातील लहान मुले, महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते. विसर्जनस्थळी पोहोचताच तळ्याला लागून असलेल्या मोहाच्या झाडावरील आग्या मोहोळच्या माशांनी भाविकांवर हल्ला केला. जीवाच्या भीतीने भाविक सैरभैर झाले. सर्वांची भीतीने तारांबळ उडाली. यात महिला व मुलासह १४ भाविक जखमी झाले. या सर्व जखमींना तत्काळ एका खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात फारशे कोणीही गंभीर नसल्याने उपचारानंतर सर्व भाविकांना रात्री उशिरा सुटी देण्यात आली.

Web Title: Bee attack on devotees who have gone for Ganpati immersion