स्वप्न अधिकारी होण्याचे :
By Admin | Updated: July 22, 2015 00:10 IST2015-07-22T00:10:28+5:302015-07-22T00:10:28+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने दर महिन्याला स्पर्धा परीक्षा महाचर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

स्वप्न अधिकारी होण्याचे :
जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने दर महिन्याला स्पर्धा परीक्षा महाचर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यानुसार २१ जुलै रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात स्पर्धा परीक्षा महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शहरासह जिल्ह्यातील शेकडो तरुण सहभागी झाले होते. या चर्चेत राळेगावचे परीविक्षाधीन उपविभागीय अधिकारी जे.आर. विधाते, यवतमाळचे परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी विकास माने, कळंबचे परिविक्षाधीन नायब तहसीलदार राजेश पऊळ यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेद्वारे नोकरीची संधी आदींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दर महिन्याला या मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांची अशीच गर्दी असते.