शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

कोरोनामुळे महिला पोलिसांसाठी समाजच बनला कुटुंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

कर्तव्य निभावत असताना महिला पोलिसांच्या मनात कुठलाही संकोच नाही. केवळ राष्ट्राप्रती समर्पण भावनेतून त्या काम करीत आहे. स्वत:च्या सुरक्षेची खबरदारीही त्या घेत आहे. सोबतच कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. या रनरागिणी जनतेच्या सुरक्षेसाठी आपले घरदार विसरून कर्तव्य पार पाडत आहे. देश, राज्य, जिल्ह्यातील जनतेला कोरोनापासून वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देचौका चौकात कर्तव्यावर हजर : भीती अजिबात नाही, आहे ती समर्पणाची भावना

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे सर्व घरात बंदिस्त झाले आहे. या काळात इतर कर्मचाऱ्यांसह पोलीस जनतेच्या सेवेत व्यस्त आहे. घरोघरी महिला कुटुंबाच्या सेवेत असताना महिला पोलीस कर्मचारी मात्र कर्तव्य बजावत आहे. सतत १२ तास ड्यूटी निभावत आहे. पोलीस मुख्यालय, क ळंब चौक, बसस्थानक चौक, दर्डा नाका, तिवारी चौक, दत्त चौक, स्टेट बँक चौक या भागात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.कर्तव्य निभावत असताना महिला पोलिसांच्या मनात कुठलाही संकोच नाही. केवळ राष्ट्राप्रती समर्पण भावनेतून त्या काम करीत आहे. स्वत:च्या सुरक्षेची खबरदारीही त्या घेत आहे. सोबतच कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. या रनरागिणी जनतेच्या सुरक्षेसाठी आपले घरदार विसरून कर्तव्य पार पाडत आहे. देश, राज्य, जिल्ह्यातील जनतेला कोरोनापासून वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.यवतमाळात कर्तव्यावर असलेल्या भारती, सुवर्णा काम करतात. त्या अनेक वर्षांपासून नोकरी करीत आहे. ‘देशसेवा’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला. त्या ड्यूटीवर येण्यापूर्वी घरातील दैनंदिन कामे आटोपतात. मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.जयश्री, प्रिती, सारिका आणि चैताली यांची चेकपोस्टवर ड्यूटी लावण्यात आली. तेथे त्या सलग १२ तास काम करतात. पहाटे ५ वाजतापासून त्यांची दिनचर्या सुरू होते. सकाळी व्यायाम आणि नंतर घरातील दैनंदिन कामे केल्यानंतर त्या कर्तव्यावर हजर होतात. अनिता २३ वर्षांपासून नोकरीत आहे. कोरोनामुळे त्यांच्यावर सर्वाधिक जबाबदारी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरी पाहुणे अडकले आहे. त्यात नातेवाईकांचे लहान बाळ आहे. परिणामी जबाबदारी वाढली. घरच्या कामासोबत फिल्डवरही काम वाढले. मात्र कुणालाही कोरोना होऊ नये, याची खबरदारी घेत त्या कर्तव्य निभावत आहे. वनिता ५ वर्षांपासून दामिनी पथकात आहे. कोरोनामुळे त्यांच्या आईने रजा घेण्याची सूचना केली. मात्र जबाबदारी सोडून पळ काढणार नाही, असे म्हणत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. सरिता नुकत्याच पोलीस दलात रुजू झाल्या. कुटुंबातील प्रत्येकाला त्यांची काळजी वाटते. मात्र या संकटकाळात सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणारच, या निश्चयाने कर्तव्य बजावत आहे.महिला विनाकारण बाहेर पडत नाहीतसंचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्यांची पोलिसांतर्फे प्रत्येक चौकात तपासणी केली जाते. घराबाहेर निघणाऱ्यांमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण नगण्य आहे. महिला विनाकारण घराबाहेर पडत नाहीत, असे मत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. जनतेच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणेसह आम्ही पोलीस तत्पर असून जनतेने नियमांचे तंतोतंत पालन करून या संकटकाळात सहकार्य करावे, असे आवाहनही महिला पोलिसांनी केले.नातेवाईक म्हणतात, काळजी घे!भारती, सुवर्णा या महिला पोलीस सायंकाळी घरी परतल्यानंतर प्रथम गणवेश धुऊन काढतात. अंघोळीनंतरच घरात प्रवेश करतात. त्यांना आई, वडील, सासू, सासरे, पती आणि इतर नातेवाईक वारंवार काळजी घेण्याची सूचना करतात. कुटुंबाचा हा जिव्हाळा, आपुलकी बघून त्यांना आपल्या कर्तव्याचे चिज झाल्यासारखे वाटते. मात्र घर आणि कर्तव्य याची सांगड घालताना त्यांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते.तान्हुल्याला घरी सोडून कर्तव्यावरपोलीस दलातील जयश्री यांची कहाणी फारच वेगळी आहे. पोटच्या बाळाला घरी सोडून त्या ड्यूटी करीत आहेत. त्यांच्या मनाची घालमेल होतेच, पण कर्तव्याला त्यांनी प्राधान्य दिले. दिवसभर उन्हातान्हात काम करून नंतर त्यांना तान्हुल्याला सांभाळावे लागते. जनतेच्या रक्षणात आपलाही खारीचा वाटा असल्याचे समाधान व्यक्त करताना त्या म्हणतात, तान्हुल्याला पाहिल्यावर दिवसभराचा ताण कमी होतो.महिला म्हणजे कुटुंब सांभाळणारी महत्त्वाची व्यक्ती. पण पोलीस असलेल्या महिलांसाठी सध्या समाज म्हणजेच घर झाले आहे. कोरोनाच्या संकटात घरदार बाजूला सारून त्यांना चौका चौकात कर्तव्य बजावावे लागत आहे. यवतमाळात १२५ महिला पोलीस उन्हातान्हात रस्त्यावर आहे. मुख्यालय, शहर ठाणे, अवधूतवाडी आणि लोहारा ठाण्यातील महिला पोलिसांचा यात समावेश आहे. मात्र त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नाही, उलट समर्पण भावना अधिक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस