शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक बनून आले आणि आठ लाखांचे सोने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

गणपती मंदिर परिसरात अनेक सुवर्ण कारागिर आहे. तेथे दागदागिने घडविण्याचे काम केले जाते. याच परिसरातील महाकाली मंदिराजवळ असलेल्या संजय शिवकुमार सामंत या कारागिराकडे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दोघे जण आले. त्यांनी ३०० मिली सोने पाहिजे आहे, अशी विचारणा केली. सकाळची वेळ असल्याने कारागिराच्या दुकानातही गर्दी नव्हती. कारागिर ३०० मिली सोने मोजून दिले. दोन हजार रुपये घेतले.

ठळक मुद्दे२४ तासात दहा लाखांचा मुद्देमाल उडविला : सोमवारी मध्यरात्रीनंतर सलग चोरीच्या दोन घटना, बॅटरी दुकान फोडले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील गणपती मंदिर परिसरातील एका सुवर्ण कारागिराकडे दोघे जण ग्राहक बनून आले. त्यांनी दोन हजार रुपयांचे सोने खरेदीचा व्यवहार केला. याच दरम्यान हात चलाखीने दुकानात ठेवून असलेल्या १६५ ग्रॅम सोने लंपास केले. हा प्रकार त्या कारागिराला उशिरा लक्षात आला. तोपर्यंत या दोन्ही ग्राहकांनी पोबारा केला होता.गणपती मंदिर परिसरात अनेक सुवर्ण कारागिर आहे. तेथे दागदागिने घडविण्याचे काम केले जाते. याच परिसरातील महाकाली मंदिराजवळ असलेल्या संजय शिवकुमार सामंत या कारागिराकडे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दोघे जण आले. त्यांनी ३०० मिली सोने पाहिजे आहे, अशी विचारणा केली. सकाळची वेळ असल्याने कारागिराच्या दुकानातही गर्दी नव्हती. कारागिर ३०० मिली सोने मोजून दिले. दोन हजार रुपये घेतले. हे दोन्ही ग्राहक दुकानातून निघून गेले. दरम्यान, संजय सामंत याला दुकानातील सोने ठेवलेला डब्बा दिसला नाही. १६५ ग्रॅम सोने असलेला स्टिलचा डब्बा गायब होता. त्याला संशय आल्यानंतर त्याने शोधाशोध केली. मात्र तो डब्बा ग्राहक बनून आलेल्या त्या दोघांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यामध्ये विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून हे दोन चोर आल्याचे स्पष्ट झाले.सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या दोघांचे चेहरेही स्पष्ट आले आहेत. पोलिसांनी रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची खातरजमा केली. मात्र सीसीटीव्ही दिसणारे दोन्ही चेहरे नवीन असून ते बाहेरगावचे असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.सराफा कारागिराकडे इराणी टोळीप्रमाणे गुन्हासाधारणत: ग्राहक बनून चोरी करण्याचे प्रकार ही इराणी टोळी अवलंबते. सराफा कारागिराकडे झालेली चोरीची घटना ही त्याच पद्धतीशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहे. इराणी टोळीतील सदस्य गोरपान व धिप्पाड असतात. यवतमाळातील गुन्ह्यात आढळलेले दोन्ही संशयित साधारण देहयष्टीचे असल्याचे दिसून आले. तूर्त पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजव्यतिरिक्त कुठलाही सुगावा लागलेला नाही.टांगा चौकातील दुकानात दोन लाखांची चोरीसोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने टांगा चौकातील बॅटरीच्या दुकानाचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. दुकानात असलेली दीड लाख रोख व काही बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या. २४ तासात मेनलाईन परिसरात चोरट्यांनी दहा लाखांच्या वर मुद्देमाल लंपास केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बॅटरी दुकानात चोरीच्या घटनेची तक्रार सचिन पालडीवाल यांनी दिली. या प्रकरणी वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :ThiefचोरGoldसोनं