दरवाढीसाठी म्हशीला दुधाने आंघोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:10 PM2018-07-18T22:10:22+5:302018-07-18T22:10:39+5:30

दुधाला प्रतिलिटर ५ रुपये भाववाढ मिळावी यासाठी राज्यात जनआंदोलन सुरू आहे. हे आंदोलन पुसदमध्येही पेटले असून शेतकऱ्यांनी भरचौकात म्हशींना दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध नोंदविला.

Bathe milk for buffaloes | दरवाढीसाठी म्हशीला दुधाने आंघोळ

दरवाढीसाठी म्हशीला दुधाने आंघोळ

Next
ठळक मुद्देपुसदमध्ये पेटले आंदोलन : प्रतिलिटर ५ रुपये वाढवा, स्वाभिमानी शेतकरी संघटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : दुधाला प्रतिलिटर ५ रुपये भाववाढ मिळावी यासाठी राज्यात जनआंदोलन सुरू आहे. हे आंदोलन पुसदमध्येही पेटले असून शेतकऱ्यांनी भरचौकात म्हशींना दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध नोंदविला.
फसव्या कर्जमाफी सारख्या आश्वासनाला शेतकरी बळी पडले. आता सरकार दूध उत्पादकांनाही फसविण्याच्या बेतात आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये इतका अधिक भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बुधवारी शिवाजी चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन म्हशींना दुधाने धुवून सरकारचा निषेध केला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव लांडगे, केशवराव खंदारे, सरदार खाँ सदर खाँ, नामदेव महाजन, प्रेमराव सरगर, शरद मस्के, गजानन पडघणे, आनंदराव गोरे, सुनील नांगुलकर, गजानन गोरे, भीमराव इंगळे, आकाश शिंदे, संजय दिंडे, अजय दिंडे, गोलू चोपडे आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Bathe milk for buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.