महावितरणला ग्राहक मंचचा दणका
By Admin | Updated: October 9, 2014 23:10 IST2014-10-09T23:10:13+5:302014-10-09T23:10:13+5:30
येथील पंजाब चिकटे यांना महावितरणचे कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी वीज देयकप्रकरणी त्रास दिल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दोन्ही अभियंत्यांनी चिकटे यांना

महावितरणला ग्राहक मंचचा दणका
नांदेपेरा : येथील पंजाब चिकटे यांना महावितरणचे कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी वीज देयकप्रकरणी त्रास दिल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दोन्ही अभियंत्यांनी चिकटे यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे़
येथील पंजाब चिकटे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत न्याय मंचात संबंधित अभियंत्याविरूध्द तक्रार दाखल केली होती़ मार्च २०१२ पासून सप्टेंबर २०१३ पर्यंत त्यांना सरासरी युनिटचे देयक देण्यात आले होते. ते चिकटे यांनी भरले़ सदरचे देयक जास्त असल्याने त्यांनी मीटर बदलवून देण्याबाबत महावितरणकडे अनेकदा अर्ज केले होते. मे २०१२, डिसेंबर २०१२, नोव्हेंबर २०१३ रोजी त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दिले़ दरम्यान १५ फेब्रुवारी २०१२ पासून आॅक्टोबर २०१३ पर्यंत त्यांना २० महिन्यांचे दोन हजार ६१५ युनिटचे देयक पाठविण्यात आले. त्यापैकी चिकटे यांनी सप्टेंबर २०१३ पर्यंत एक हजार १९० युनिटचे देयक भरले़ ग्राहकाचा वीज वापर अतिशय मर्यादीत आहे. त्यांच्या वापरानुसार त्यांना प्रतिमाह १४़२५ युनिटचे देयक मिळणे गरजेचे होते. मात्र देयक जादा येत होते.
या जादा वीज देयकाबाबत त्यांनी जादा अदा केलेली रक्कम पाच हजार रूपये आहे, असा त्यांचा दावा होता. संबंधित दोन्ही अभियंत्यांनी चिकटे यांना वीज देयकापोटी अतिरिक्त रक्कम घेतली. ही अतिरिक्त रक्कम महावितरणकडे जमा झाली असेल, तर ती पुढील देयकात समायोजित करून घ्यावी व त्या संबंधीचा अहवाल ग्राहक न्याय मंचाकडे द्यावा, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. तसेच चिकटे यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल संबंधित अभियंत्यांनी पाच हजार रूपये, तक्रारीचा खर्च रूपये दोन हजार रूपये, देण्याचे आदेशही जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिले आहे. हे आदेश संबंधित ग्राहकाला प्राप्त झाले आहे. आता महावितरणने कारवाई न केल्यास ते अपिलात जाणार आहे. (वार्ताहर)