येताहेत बाप्पा!
By Admin | Updated: September 15, 2015 05:10 IST2015-09-15T05:10:11+5:302015-09-15T05:10:11+5:30
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला केवळ दोन दिवस उरलेत. एकीकडे मंडळाचे कार्यकर्ते मंडप साकारण्यात मग्न

येताहेत बाप्पा!
यवतमाळ : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला केवळ दोन दिवस उरलेत. एकीकडे मंडळाचे कार्यकर्ते मंडप साकारण्यात मग्न आहेत. तर त्याचवेळी मूर्तिकारांच्या दालनात गणेशाच्या नाना तऱ्हेच्या मुद्रा सज्ज झाल्या आहेत. अखेरच्या टप्प्यात मूर्तिकारांचे कुंचले गणरायांच्या मूर्तीला रंगछटा देत आहेत. गणरायाचे वस्त्र, आभूषणे चढविण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. मूर्तिकारांच्या घरांपुढे सध्या या निर्माणाधीन मूर्ती पाहण्यासाठीही गर्दी होत आहे.