बँकांनी ग्राहकांना सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:58+5:30

सध्या बँकेत शेतकरी व ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. त्यात बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद राहते. कोणताही कर्मचारी बाहेर राहात नाही. बँकेसमोर लाकडी बॅरीगेटस लावण्यात आले. तेथेच ग्राहकांना उभे राहण्यास सांगितले जाते. मात्र पार्किंग व बॅरीगेटसमधून जाण्याचा मार्ग एकच असल्याने गोंधळ उडतो. बँकेत टॉयलेटला सतत कुलूप असते.

Banks left customers in the lurch | बँकांनी ग्राहकांना सोडले वाऱ्यावर

बँकांनी ग्राहकांना सोडले वाऱ्यावर

ठळक मुद्देआर्णी तालुका : पाणीही नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहकांना वाºयावर सोडले आहे. बँकेत ग्राहक व शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. ग्राहकांना उभे राहण्यासाठी धड जागाही नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या बँकेत शेतकरी व ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. त्यात बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद राहते. कोणताही कर्मचारी बाहेर राहात नाही. बँकेसमोर लाकडी बॅरीगेटस लावण्यात आले. तेथेच ग्राहकांना उभे राहण्यास सांगितले जाते. मात्र पार्किंग व बॅरीगेटसमधून जाण्याचा मार्ग एकच असल्याने गोंधळ उडतो. बँकेत टॉयलेटला सतत कुलूप असते. ग्राहकांना हात धुण्यास पाणी नाही. सॅनिटायझरची व्यवस्था नाही. अनेक ग्राहक व शेतकरी बँकेबाहेर तासन्तास उन्हातान्हात ताटकळत राहतात.
या शाखेत नेहमी शेतकरी व ग्राहकांची गर्दी होते. याबाबत अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, हात धुण्यास पाणी, पिण्याचे पाणी, सॅनिटायझर, उन्हापासून बचावासाठी नेट आदींची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. मात्र बँकेने या सूचनांना केराची टोपली दाखविली आहे. अधिकारी उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वरिष्ठांनी भेट देवून दंडीत करावे, अशी मागणी होत आहे.
सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी बँकेत गर्दी करीत आहे. पीककर्ज लवकर मिळावे, अशी अपेक्षा आहे.

ग्राहकांच्या तुलनेत जागा अपुरी आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
- योगीता आडे
शाखा व्यवस्थापक, जिल्हा बँक

चारही बँकांमध्ये पाण्याची सुविधा नाही
येथील शिवनेरी चौकात विविध चार बँका आहे. मात्र कुठेही पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. गेली दोन महिने तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी मोफत पाण्याची व्यवस्था केली होती. आता मात्र कुठेही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. जिल्हाधिकाºयांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी व ग्राहकांकडून होत आहे.

Web Title: Banks left customers in the lurch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक