शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

राज्यात तयार होतेय शैक्षणिक उपक्रमांची बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:51 AM

चांगल्या शिक्षकांनी आपले उपक्रम त्यात ‘डिपॉझिट’ करायचे आणि गरजू शिक्षकांनी ते अभ्यासून अध्यापनात सुधारणा करायची, अशी ही उपक्रम पेढी विद्या प्राधिकरण साकारणार आहे.

ठळक मुद्देविद्या प्राधिकरण साकारणार अध्यापनाच्या आगळ्या हातोटीची शाळा-शाळांमध्ये देवाण घेवाण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसे शिक्षक तितक्या अध्यापनाच्या पद्धती. प्रत्येक गुरुजीची शिकविण्याची हातोटी वेगळी असते. परंतु, अशा प्रभावी अध्यापनाच्या ‘ट्रिक’ ठाऊक नसलेलेही हजारो शिक्षक आहेत. अशा शिक्षकांसाठी आता राज्यस्तरावर आगळीवेगळी बँक तयार होत आहे. चांगल्या शिक्षकांनी आपले उपक्रम त्यात ‘डिपॉझिट’ करायचे आणि गरजू शिक्षकांनी ते अभ्यासून अध्यापनात सुधारणा करायची, अशी ही उपक्रम पेढी विद्या प्राधिकरण साकारणार आहे.विशेष म्हणजे, उत्तम शैक्षणिक उपक्रम देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पुण्याच्या विद्या प्राधिकरणाचा संशोधन विभाग उपक्रमांच्या संकलनासाठी तयारीला लागला आहे. नव्या शैक्षणिक सत्रापासून उपक्रमांची बँक राज्यभरातील प्रत्येक शिक्षकासाठी सज्ज होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील चांगले उपक्रम संकलीत करण्यासाठी विद्या प्राधिकरणाने ‘नवोप्रकम स्पर्धा’ घोषित केली आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील कोणत्याही शिक्षकाला त्यात सहभागी होता येणार आहे. त्यासोबतच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, डायटचे अधिव्याख्याता, डीएडचे शिक्षक आदींसोबतच प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनाही यात सहभागाची संधी आहे. त्यासाठी प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड यांनी लिंक ओपन केली असून त्यावर स्पर्धकांनी आपले उपक्रम आॅनलाईन अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.संकलन पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाच्या वेबसाईटवर ही बँक प्रकाशित होणार आहे. त्यामुळे गरजू शिक्षकांना हे उपक्रम हवे तेव्हा ‘रेफर’ करून आपल्या अध्यापनात सुधारणा करता येणार आहे. उत्कृष्ट उपक्रम देणाऱ्या प्रत्येक गटातील पाच शिक्षकांना जिल्हास्तरावर, त्यानंतर राज्यस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेत चांगले अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणार आहे. तर खेड्यापाड्यातील शिक्षकांच्या संशोधन प्रवृत्तीला चालनाही मिळणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र