बंजारा समाज प्रबोधन परिषद

By Admin | Updated: July 1, 2015 00:25 IST2015-07-01T00:25:18+5:302015-07-01T00:25:18+5:30

मानव सेवा प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ....

Banjara Samaj Prabodhan Parishad | बंजारा समाज प्रबोधन परिषद

बंजारा समाज प्रबोधन परिषद

यवतमाळ : मानव सेवा प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त येथील आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनमध्ये बुधवार १ जुलै रोजी बंधारा समाज प्रबोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ होईल.
यावेळी विविध विषयांवर माजी प्राचार्य वसंत राठोड, भटक्या विमुक्त युथ फ्रन्टचे अध्यक्ष प्रा.मोतीराज राठोड, सत्यशोधक समाजाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.श्याम मुडे, माजी प्राचार्य जे.डी. जाधव व गोविंद पवार आदींचे मार्गदर्शन होईल. पी.बी. आडे यांचे अध्यक्षीय भाषण होईल. तसेच बंजारा टिचर्स असोसिएशनच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मानव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी.बी. आडे तसेच बंजारा टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष पी.पी. पवार, देवीदास राठोड व शंकर आडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेत कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रम
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. जिल्हा परिषद सभागृहात दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कृषी विषयावर अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, कृषी विकास अधिकारी जगन राठोड उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, डॉ.एन.डी. पार्लावर, डॉ.राजेंद्र गाडे, डॉ.सी.यू. पाटील, डॉ.एन.आर. पाटील, डॉ.गोपाल ठाकरे आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

Web Title: Banjara Samaj Prabodhan Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.