जिल्हाभरातील बीडीओंचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 21:46 IST2018-12-20T21:45:25+5:302018-12-20T21:46:42+5:30
तेल्हाराचे गटविकास अधिकारी राजीव फडके यांना बुधवारी काळे फासण्यात आले. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यातील बीडीओंनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. आरोपीच्या अटकेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला.

जिल्हाभरातील बीडीओंचे कामबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तेल्हाराचे गटविकास अधिकारी राजीव फडके यांना बुधवारी काळे फासण्यात आले. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यातील बीडीओंनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. आरोपीच्या अटकेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला.
गटविकास अधिकारी राजेश फडके यांना काही समाजकंटकांनी अपंगाचा निधी, घरकुलाचा लाभ देणे अशा बाबी विचारत मारहाण केली व तोंडाला काळे फासले. ते तणावात असून रूग्णालयात भरती आहेत. आंदोलकांचे धमकीवजा फोन येत आहे. आरोपींना अटक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. गटविकास अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेश गायनार, राज्य कार्याध्यक्ष राजेश कुळकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चौधर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, यवतमाळचे बीडीओ अमित राठोड, उज्ज्वल ढोले, कळंब बीडीओ सुशील संसारे, घाटंजीचे सहाय्यक बीडीओ मंगेश आरेवार, झरीचे बीडीओ सुभाष चव्हाण, पुसदचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गवई, राळेगावचे बीडीओ रविकांत पवार, बाभूळगावचे बीडीओ संजय गुहे, रमेश दोडके, एस.बी. मनवर, मोरेश्वर लिखार उपस्थित होते.