दिग्रस येथे बहुजन क्रांती मोर्चा धडकला

By Admin | Updated: May 16, 2017 01:34 IST2017-05-16T01:34:49+5:302017-05-16T01:34:49+5:30

समाजातील सर्व जाती समूह व विविध घटकांचे एकत्रीकरण करून बहुजन समाजाच्या हक्क, ...

Bahujan Kranti Morcha shocked at Digras | दिग्रस येथे बहुजन क्रांती मोर्चा धडकला

दिग्रस येथे बहुजन क्रांती मोर्चा धडकला

३६ विविध मागण्यांचे निवेदन : बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : समाजातील सर्व जाती समूह व विविध घटकांचे एकत्रीकरण करून बहुजन समाजाच्या हक्क, अधिकाराच्या समर्थनार्थ दिग्रस येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. भर दुपारी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये महिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संताजी महाराज सभागृहापासून हा पायदळ मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले.
मोर्चेकऱ्यांनी आपल्या ३६ मागण्यांचे निवेदन राज्यपालांसाठी तहसीलदार व्ही.बी. इंगोले व एस.के. पांडे यांच्याकडे दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन खार्डे, योगेश दंदे आदी उपस्थित होते.
लोकशाहीला मारक असलेल्या ईव्हीएम तत्काळ रद्द करून बॅलेटपेपरवरच मतदान घेण्यात यावे, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे जलदगती न्यायालयात निकाली काढून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गाचीही जातीनिहाय गणना व्हावी, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टची अंमलबजावणी व्हावी, मंडल कमिशन, सच्चर कमिशन व नच्चीपन कमिशनच्या शिफारशी तत्काळ लागू करण्यात याव्या, संत सेवालाल महाराजांचे रुईगड येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या दारूबंदीचे कठोर पालन व्हावे, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे, २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश होता.
मोर्चात विनोद उबाळे, तिलक राठोड, वंदना खाडे, श्रेष्ठा सोळंके, पायल मडावी, नंदा कांबळे, आदित्य राहुलगडे, अतुल बोरकर, जयपाल सोनोने, एम.के. पखाले, क्षितीज ढाकणीकर, रामेश्वर पेंदोर, ओम पवार, राजू ठाकरे, अनिल भगत, दीपक मिरपासे, हरिष जीवने, अर्चना जीवने, ऋतुजा उईके, नितीन मनवर, हिमांशू राहुलगडे, गजानन सातपुते आदींसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Bahujan Kranti Morcha shocked at Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.