बदलीस पात्र शिक्षकांची जिल्हा परिषदेत भरली शाळा

By Admin | Updated: May 19, 2016 02:03 IST2016-05-19T02:03:07+5:302016-05-19T02:03:07+5:30

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी बुधवारी एकच गर्दी झाली होती. शेकडो शिक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत यादी पाहण्यासाठी धडपडत होते.

Badla School filled with Zilla Parishad for qualified teachers | बदलीस पात्र शिक्षकांची जिल्हा परिषदेत भरली शाळा

बदलीस पात्र शिक्षकांची जिल्हा परिषदेत भरली शाळा

तुंबळ गर्दी : ५४१० पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध
यवतमाळ : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी बुधवारी एकच गर्दी झाली होती. शेकडो शिक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत यादी पाहण्यासाठी धडपडत होते. यामुळे येथे एकच गोंधळ उडाला होता. जणू जिल्हा परिषदेत बुधवारी शिक्षकांची शाळाच भरल्याचा भास होत होता.
पेसा आणि नक्षलग्रस्त भागातील २३०० शिक्षक बदलीस पात्र आहेत. बुधवारी या सर्वच शिक्षकांना जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले होते. यामुळे बदलीप्रक्रियेच्या यादीत नाव पाहण्यासाठी शिक्षकांची एकच तारांबळ उडाली. यातील ३४० शिक्षकांच्या बदलीचे निर्धारण करण्यात आले असून यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा मंगळवारी रात्री ३ पर्यंत जागी होती. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला मंगळवारी ६७ शिक्षकांची बदली झाली. बुधवारी पेसा आणि नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांची बदलीप्रक्रिया राबविण्यात आली. याकरिता बदलीपात्र १९२४ सहाय्यक शिक्षकांची यादी सकाळी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर बदली प्रक्रियेला प्रारंभ होऊन ३४० बदलीचे निर्धारण करण्यात आले. सायंकाळी ७.३० पर्यंत ८९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)

याद्या फाटल्या, व्यवस्था कोलमडली
जिल्हा परिषदेच्या तळ मजल्यावर भिंतीवर बदलीपात्र शिक्षकांची यादी लावण्यात आली होती. या यादीत आपले नाव आहे का हे पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यावेळी या याद्याही फाटल्या. त्यामुळे येथे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना शिस्त शिकविणारी शिक्षक आज बदलीसाठी मात्र आज बेशिस्त झाले होते.

Web Title: Badla School filled with Zilla Parishad for qualified teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.