बाबूजींना रक्तदान शिबिराने आदरांजली
By Admin | Updated: July 2, 2014 23:26 IST2014-07-02T23:26:36+5:302014-07-02T23:26:36+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनी १६० जणांनी रक्तदान करून आदरांजली अर्पण केली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रेरणास्थळ आयोजन समिती

बाबूजींना रक्तदान शिबिराने आदरांजली
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनी १६० जणांनी रक्तदान करून आदरांजली अर्पण केली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रेरणास्थळ आयोजन समिती आणि गांधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाबूजींचे स्वातंत्र्य लढ्यातील सहकारी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्राणजीवन जानी आणि बाबाराव राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी लव दर्डा, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा.निवृत्तीनाथ पिस्तुलकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्राणजीवन जानी आणि बाबाराव राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिरात रासेयो आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तब्बल १६० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे डॉ.अभिजित कोल्हे, डॉ.सचिन जाधव, सामाजिक कार्यकर्ता भास्कर झळके, प्रदीप वाघमारे, नीळकंठ जवंजाळ, अभय मुटकुरे, संजय नेमाडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विलास देशपांडे, देवकिसन शर्मा, आनंद गावंडे, रासेयोचे प्रा.प्रेमेंद्र रामपूरकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, प्रा. अजय कोलारकर, प्रा. अभय भीष्म, प्रा. किशोर बुटले, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीचे प्रा.डॉ. राम तत्ववादी, विभागप्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा.डॉ. अतुल बोराडे, प्रा.अतुल राऊत, प्रा.पंकज पंडित, प्रा. अनिल फेंडर उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, प्रा.पद्ममिनी कौशिक, प्रा. सचिन अस्वार, प्रा. सोनल सावरकर, प्रा.धीरज शिरभाते, प्रा. दीपक उबरहांडे, प्रा.साकेत अजमिरे, प्रा.संदीप दगडी यांच्यासह प्रतीक शिरभाते, शुभम ढोरे तसेच रासेयोच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.