यवतमाळ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी जिल्हाभरातील नागरिकांनी भावपूर्ण अभिवादन केले. यवतमाळ शहरातील बसस्थानक चौकात सकाळपासूनच बाबासाहेबांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायती आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सकाळपासून बाबासाहेबांच्या अनुयायांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील बसस्थानक चौकामध्ये डॉ. बाबासाहेबांचे साहित्य, कॅसेट्स, फोटो, मूर्ती आणि विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यासाठी बाबासाहेबांच्या अनुयायांनी एकच गर्दी केली होती.
बाबासाहेब आंबेडकरांना जिल्हाभरात अभिवादन
By admin | Updated: December 7, 2015 06:08 IST