शहरानजीकच्या ग्रामपंचायती विकासापासून कोसो दूर

By Admin | Updated: February 24, 2016 02:51 IST2016-02-24T02:51:05+5:302016-02-24T02:51:05+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये पुसद शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नगरपरिषद क्षेत्राएवढाच भार

Away from the village panchayat development | शहरानजीकच्या ग्रामपंचायती विकासापासून कोसो दूर

शहरानजीकच्या ग्रामपंचायती विकासापासून कोसो दूर

पुसद : गेल्या काही वर्षांमध्ये पुसद शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नगरपरिषद क्षेत्राएवढाच भार शहरालगतच्या चार ते पाच ग्रामपंचायतींवर आला आहे. परंतु ग्रामपंचायतचे बजट हे अत्यल्प असल्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे. अद्यापही हा भाग विकासापासून कोसो दूर आहे.
येथील नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात गायमुख ग्रामपंचायतचा समावेश करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पारित करून उपविभागीय अधिकाऱ्यांना तसे निवेदन देऊन मागणी केली आहे. त्यामुळे आता विकासापासून वंचित असलेल्या पुसद शहरानजीकच्या श्रीरामपूर, धनकेश्वर, काकडदाती, बोरगडी या ग्रामपंचायतींचाही पुसद नगरपरिषदेत समावेश करण्यात येऊन तेथील परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत गायमुख नगरचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी मासिक सभेत पुसद नगरपरिषदेत समावेश करण्याचा ठराव घेण्यात आला. गणेश राठोड यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला सुधाकर जाधव यांनी अनुमोदन दिले आणि सर्वानुमते हा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना भेटून सरपंच पद्मावती खिल्लारे, उपसरपंच सुभाष राठोड, गणेश राठोड, रेखा राठोड, लतिफा बेगम पीर खाँ, बेबी खंदारे, शालू गुंडाप्पा, कापसे आदींनी निवेदन दिले.
पुसद शहरालगत श्रीरामपूर, धनकेश्वर, काकडदाती, बोरझडी व गायमुखनगर या ग्रामपंचायती असून, सर्वांची मिळून ५० हजारावरून अधिक लोकसंख्या आहे. हा संपूर्ण परिसर विकासापासून कोसो दूर आहे. पूर्वी जकातनाका असताना काही चाणक्ष व्यावसायिकांनी शहराच्याबाहेर गोदाम बांधले आहे. पुसद शहराची लोकसंख्या जैसे थे आहे पण शहरालगत जणू जुळे शहर श्रीरापूर वसले आहे. श्रीरामपूरजवळ काकडदाती आहे. अलिकडे पुस नदीच्या पात्रातील पूरग्रस्तांचे मधुकर नाईक नगर वसले आहे. त्याला ‘दुबई’ असे संबोधले जाते. ‘दुबई’चा गायमुख नगर ग्रामपंचायती समावेश होतो. त्यामुळे गायमुखसह इतरही शहरालागतच्या चार ते पाच ग्रामपंचायतींचा पुसद नगरपरिषदेत समावेश करण्याची मागणी तेथील नागरिकांची आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Away from the village panchayat development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.