बाबासाहेब आंबेडकरांवरील कलाकृतीला पारितोषिक
By Admin | Updated: February 27, 2017 00:55 IST2017-02-27T00:55:39+5:302017-02-27T00:55:39+5:30
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि ललित कला विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रसंगावर

बाबासाहेब आंबेडकरांवरील कलाकृतीला पारितोषिक
यवतमाळ : औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि ललित कला विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रसंगावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये येथील रोशन प्रमोदराव माहुरे याने साकारलेल्या कलाकृतीला पारितोषिक मिळाले. सुप्रसिद्ध चित्र व शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या उपस्थितीत त्याला पारितोषिक देवून गौरविण्यात आले. रोशनने मिळविलेल्या या यशाचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)