लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमाप पैसा खर्च होत असतानाही आश्रमशाळा आजही दारिद्र्यात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागते. सोबतच त्यांच्या शैक्षणिक विकासाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जाम आश्रमशाळेच्या भेटीप्रसंगी हे वास्तव अनुभवले आहे.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाने पुरविलेल्या तोकड्या व्यवस्थेवर समाधान मानावे लागते. राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी भागातील शिक्षण सोयी सुविधासाठी करण्यात आलेल्या तरतुदीतून आश्रमशाळेचे चित्र बदलू शकते. परंतु हा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. विद्यार्थ्यांना गाद्या व ब्लँकेटचा पुरवठा बरोबर होत नाही. एका गादीचा दर दोन हजार १०० रुपये आहे. यातून फोमची गादी दिली जावू शकते. परंतु, नारळी गाद्यांवर झोपावे लागते. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पेट्या तुटल्या आहे. नियमात असूनही जेवणात दररोज भाजी दिली जात नाही. करपलेल्या पोळ्या आणि वरणाच्या नावावर डाळीचे पाणी विद्यार्थ्यांच्या ताटात असते. अनेक आश्रमशाळांमध्ये मुलींसाठी स्नानगृह व शौचालय नाही. या असुविधांचा सामना करत असताना शैक्षणिक समस्येलाही तोंड द्यावे लागते.अनेक आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची वाणवा आहे. जाम येथील शासकीय आश्रमशाळेत गेली अनेक वर्षांपासून बारावीला पदार्थ विज्ञान विषयासाठी शिक्षकच नाही. या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.विद्यार्थिनींची ५० टक्के उपस्थितीजाम येथील आश्रमशाळेत विद्यार्थिनींची केवळ ५० टक्के उपस्थिती आढळून आली. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थिनींना घरी जाण्याची परवानगी कुणी दिली, अशी विचारणा अध्यक्ष किशोर तिवारी यांनी संबंधितांना केली. दिवाळीच्या सुट्टीत गेलेल्या विद्यार्थिनी दोन महिने परत येत नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. आदिवासी प्रकल्प अधिकारी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, सचिव आदी सनदी अधिकारी असताना हा गंभीर गोंधळ कसा, असा प्रश्न किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य सुहास पारवेकर, अंकित नैताम, बाबूलाल मेश्राम, नथ्थू वेट्टी आदी उपस्थित होते.
आश्रमशाळांची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:40 IST
अमाप पैसा खर्च होत असतानाही आश्रमशाळा आजही दारिद्र्यात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागते. सोबतच त्यांच्या शैक्षणिक विकासाकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
आश्रमशाळांची दैनावस्था
ठळक मुद्देनिकृष्ट आहार : शैक्षणिक विकासाकडेही दुुर्लक्ष, शिक्षकांची वानवा