हस्तांतरणानंतर दुकान गाळ्यांचा लिलाव
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:02+5:302015-12-05T09:09:02+5:30
शहरातील समता मैदानावर नगरउत्थान योजनेतून २१ गाळे बांधण्यात आले आहे. या गाळ््याच्या लिलावाची प्रक्रिया रखडली आहे.

हस्तांतरणानंतर दुकान गाळ्यांचा लिलाव
नगर परिषदेची विशेष सभा : महसूल विभागच करणार प्रक्रिया पूर्ण
यवतमाळ : शहरातील समता मैदानावर नगरउत्थान योजनेतून २१ गाळे बांधण्यात आले आहे. या गाळ््याच्या लिलावाची प्रक्रिया रखडली आहे. हा गुंता सोडविण्यासाठी या गाळ््याचे महसूल विभागाकडून यवतमाळ नगरपरिषदेकडे हस्तांतरण केले जाणार आहे. त्यानंतर येथील २१ गाळ््यांच्या लिलावाची प्रक्रिया होणार आहे. हस्तांतरणाच्या एकमेव विषयावर नगरपरिषदेने शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
महसूल विभागाला स्वत:च्या जागेत गाळे काढून ते भाड्याने देण्याचा अधिकार नाही. मात्र समता (पोस्टल) मैदानावर दुकाने बांधताना या नियमाची पायमल्ली करण्यात आली. नगरउत्थान विभागाच्या निधीतून महसूलाच्या जागेत बांधकाम करण्यात आले. गाळे बांधकाम करण्यापूर्वीच महसुल प्रशानाने ही जागा नगरपरिषदेला लिजवर देणे आवश्यक होते. मात्र झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. गाळ््याचा लिलाव करण्यापूर्वी ही जागा महसूल विभागाकडून नगरपरिषदेला ५० ते ६० वर्षासाठी लिजवर दिली जाणार आहे. त्यासाठी नगरपरिषदेकडून विशिष्ट रक्कम महसूल विभागाला प्राप्त होणार आहे. हा करार झाल्यानंतर नगरपरिषदेला या गाळ््याच देखभाल दुरूस्तीसह भाडे वसूलीचा अधिकार मिळणार आहे. नगरपरिषदेने याच विषयावर तातडीने विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. महसूल विभागाकडून गाळे हस्तांतरीत करून घेताना कोणत्या स्वरूपाचा करार कराव, लिज किती वर्षांचा असेल यावर सर्वानुमते निर्णय घेतला जाणार आहे. सभागृहात याची चर्चा होणार आहे. त्यानंतर गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून त्याचा लिलाव केला जाईल. (कार्यालय प्रतिनिधी)