शासकीय वाहनाने झालेला अपघात दडपण्याचे प्रयत्न

By Admin | Updated: June 5, 2015 00:16 IST2015-06-05T00:16:11+5:302015-06-05T00:16:11+5:30

सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव कार्यालयाचे एम.एच.२९/६२७४ या बोलेरो वाहनाने झालेला अपघात दडपण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे.

Attempts to suppress accidents by government vehicles | शासकीय वाहनाने झालेला अपघात दडपण्याचे प्रयत्न

शासकीय वाहनाने झालेला अपघात दडपण्याचे प्रयत्न

महागाव : सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव कार्यालयाचे एम.एच.२९/६२७४ या बोलेरो वाहनाने झालेला अपघात दडपण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे उमरखेड येथील एक अभियंता अपघाताच्या वेळी हे वाहन चालवत होता.
या अपघातात रोजमजुरीवर आलेल्या एका गरीब कुटुंबातील शंकर गजानन गारूडे हा १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ३० मे रोजी सकाळी ६ वाजता पुसद-यवतमाळ मार्गावर पुसदपासून पाच कि़मी. अंतरावर घडली. घटनेनंतर प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या पुसद येथील मधुकरनगरातील रहिवासी सुखदेव वाघमारे यांनी पोलीस व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली.
प्रत्यक्षदर्शीच्या मते सदर वाहन अभियंता वाहन चालवित होते. अपघातानंतर त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. गंभीर जखमी अवस्थेत मुलाला पुसद शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्या कुटुंबीयाला पोलिसात जाऊ नये म्हणून धमकविण्यात
आले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन ३० मेपासून ४ जूनपर्यंत अभियंता कार्यालयात दडवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता बोराडे यांनी गुरुवारी दुपारी या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू केली व अपघातग्रस्त वाहनाचे लॉक बुक ताब्यात घेतले. या प्रकरणाची प्रभारी अधीक्षक अभियंता विजय बनगिनवार यांनीही दखल घेतली असून कारवाईचे संकेत दिले आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Attempts to suppress accidents by government vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.