फिरत्या वन पथकाला खोटे ठरविण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 19, 2015 02:25 IST2015-12-19T02:25:50+5:302015-12-19T02:25:50+5:30

यवतमाळ व पांढरकवडा फिरत्या पथकाची जप्ती खोटी ठरविण्यासाठी सावळी सदोबा जंगलांमध्ये पुन्हा सागवान जप्त केले.

An attempt to mislead the rotating forest station | फिरत्या वन पथकाला खोटे ठरविण्याचा प्रयत्न

फिरत्या वन पथकाला खोटे ठरविण्याचा प्रयत्न

सावळीतील वृक्षतोड : पुन्हा जप्तीची ‘कामगिरी’
यवतमाळ : यवतमाळ व पांढरकवडा फिरत्या पथकाची जप्ती खोटी ठरविण्यासाठी सावळी सदोबा जंगलांमध्ये पुन्हा सागवान जप्त केले.
सावळी जंगलात आॅक्टोबरमध्ये अवैध वृक्षतोड उघडकीस आली होती. यातील वरुड (तुका) बीटमध्ये कक्ष क्र. ४, ५ व ६ चे निरीक्षण यवतमाळ फिरते पथकाचे आरएफओ गौपाल यांनी केले. त्यात १७६ थुटं आढळून आली. पांढरकवडा फिरते पथकाचे आरएफओ वारे यांनी माळेगाव बीटमधील कक्ष क्र. ७ आणि ८ ची तपासणी केली. तेथे ११३ थूटं आढळून आले. यात वनरक्षक ते आरएफओवर कारवाई अपेक्षित होती. मात्र ती तर दूर उलट याच वन अधिकाऱ्याने फिरत्या पथकांच्या कारवाईत संभ्रम निर्माण करून ती खोटी ठरविण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आर्णीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजारी जाधव यांनी वरुड बीटमधून १५ घनमीटर सागवान जप्त दाखवून वन गुन्हा नोंदविला. तशीच ‘कामगिरी’ माळेगाव बीटमध्य केली गेली. जप्तीच्या या ‘कामगिरी’ने फिरत्या पथकाची पहिली कारवाई सदोष दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या अवैध वृक्षतोडीची चौकशी फिरत्या पथकाकडून काढून घेऊन सहायक वनसंरक्षक लक्ष्मण गाडे यांच्याकडे दिली. वास्तविक गाडे यांच्याच कार्यक्षेत्रात ही वृक्षतोड झाली असताना ते किती प्रामाणिकपणे याची चौकशी करतील हा संशोधनाचा विषय आहे. यवतमाळ वनपरिक्षेत्रात ई-वर्ग जमिनीवरील अवैध वृक्षतोडीत वन मजुरांपासून निलंबन कारवाईचा प्रारंभ झाला आहे तर दुसरीकडे सावळीतील संरक्षित वनात भलीमोठी वृक्षतोड होऊनही अद्याप कारवाई झाली नाही. ही कारवाई ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

अंजनखेड वनपालाचा हॅमर
डीएफओ प्रमोद लाकरा यांनी ११ आॅक्टोबर रोजी आर्णी वनपरिक्षेत्रातील सुभाषनगर लोकरवाडी येथे घातलेल्या धाडीत २६ नग सागवान सापडले होते. विशेष असे त्यावर अंजनखेड क्षेत्र सहायकाचा सरकारी पासिंग हॅमर आढळून आला होता. शासकीय मालावर मालकीचा हॅमर सापडल्याने गैरप्रकार सिद्ध झाला. या वन क्षेत्रपालाचा ‘मावसा’ हा हस्तक आहे. माळेगावातही ‘पॉवर’ फुल तस्कर आहे. तो माल कापतो आणि मावसा ट्रॅक्टरने वाहतूक करतो. मात्र त्यात अद्याप कारवाई नाही.

Web Title: An attempt to mislead the rotating forest station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.