शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

शेतकऱ्यांची नवी पिढी प्रश्न विचारू लागली म्हणून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले : डॉ. शरद बाविस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 12:49 IST

बुधवारी ते यवतमाळ येथे ‘लोकमत’शी बोलत होते.

ठळक मुद्देपॉलिटिकल स्पेस परिवर्तनीय, ट्रम्प हरलेत, ग्लोबल फॅक्टर समजून घ्या

विशाल सोनटक्के

यवतमाळ : शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची नवी पिढी उच्चशिक्षणाकडे वळत असून तिला समाजाचं आकलन हाेत आहे. आपलं स्थान कुठे आहे ते समजल्यानंतर ही मुले प्रश्न विचारू लागलीत. त्यामुळेच देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रतिगाम्यांकडून हल्ले केले जात आहेत; मात्र हे फार काळ चालणार नाही. राजकारणातील हार-जीत ही त्यावेळच्या पॉलिटिकल स्पेसवर अवलंबून असते. ती परिवर्तनीय असते. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हरलेत, हा ग्लोबल फॅक्टरही यानिमित्ताने समजून घ्यायला हवा, असे मत 'भुरा' पुस्तकाचे लेखक तथा जेएनयूचे प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांनी मांडले.

बुधवारी ते यवतमाळ येथे ‘लोकमत’शी बोलत होते. वाचन संस्कृती संपत आहे, अशी नेहमी ओरड होते; मात्र ठिकठाक लिहिलं तर लोकं वाचतात. हे 'भुरा' मुळे लक्षात आले. या पुस्तकाच्या सात महिन्यात चार आवृत्त्या संपल्या आहेत. जेएनयूमधील घटना, घडामोडींचा साक्षीदार असल्याने या नोंदी आल्या पाहिजेत, म्हणून 'भुरा' लिहिल्याचे ते म्हणाले. दोन हजारांच्या नोटांमध्ये चीप बसविल्याच्या वातावरणात हे पुस्तक आले. यात तथ्यात्मक आणि तर्कात्मक दृष्टीने मांडणी केल्याने वाचकांनी त्याला उचलून घेतल्याचे डॉ. बाविस्कर यांनी सांगितले.

शिक्षणात काही स्थानिक संस्कृतीचे, तर काही वैश्विकतेचे घटक असतात. दिल्लीच्या जेएनयूमध्ये दाखल झालो, तो एक प्रकारे छोटा भारतच आहे. देशाच्या विविध भागातील विद्यार्थी तिथे शिक्षणाचे धडे घेतात. या विद्यार्थ्यांना देशाविषयी, मातृभूमीविषयी कळकळ, प्रेम कसे नसेल? मात्र, तरीही या विद्यार्थ्यांना आणि संस्थेला ठरवून लक्ष्य केले गेले. मागील काही वर्षांत सगळ्या भारतालाच 'रिपब्लिक' करून टाकले. पटत नाही त्याला ‘म्यूट’ करण्याची ही संस्कृती, आमच्यापुढे कोणी जाऊ नये यातून आल्याचे बाविस्कर म्हणाले. यासाठीच जेएनयू, टीस, हैदराबादसारखी नामांकित विद्यापीठे बदनाम केली जात असून, इथल्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरविले जात असल्याचे ते म्हणाले.

डाव्या, आंबेडकरी, परिवर्तनवादी विचारांची पीछेहाट होत असल्याचे दिसत असले तरी आपण किती अवघड गोष्ट करतोय, प्रवाहाविरुद्ध लढतोय, हे चळवळीतील कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे. सोशल डार्विनवाद सांगतो, मोठा लहानाला खातो परंतु परिवर्तनवादी चळवळी नैतिकता बाळगून लहानालाही जगण्याचा अधिकार मांडतात. फॅसिजम तत्त्वाविरुद्ध लढतात. त्यामुळे ही लढाई अवघड आहे. अस्वस्थता येत असली तरी जी मानसिकता आज थयथयाट करते, ती मागच्या ९० वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत आहे. स्वातंत्र्यानंतर जे परिवर्तन झाले, ते त्यांच्या जिव्हारी लागले. त्यामुळेच आधुनिक तंत्रांचा वापर करून ते विजय मिळवू पाहात आहेत; मात्र ९० वर्षे अदृश्य पद्धतीने काम करणाऱ्या अनेकांचा संघीय चेहरा आज पुढे आला, हेही कमी नसल्याची टिप्पणी त्यांनी नोंदविली.

हे तर वैचारिक युद्ध, प्रयत्न सोडू नका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे आणि स्वातंत्र्याचा खून करणाऱ्या या दोन मानसिकता आपल्या देशात कायम द्वंदात्मक वावरत आल्या आहेत. आज उजव्या विचारांचा विजय होत असल्याचे दिसत असले तरी तो ओढून ताणून आणलेला विजय आहे. हिटलरसारखा स्टेट फॉरवर्ड नाही. त्यांच्यातही पराकोटीचे मतभेद आहेत. त्यामुळे समतेसाठी लढणाऱ्यांनी प्रयत्नवाद सोडू नये, इतिहासाच्या दृष्टीने दहा वर्षे हा कालावधी क्षुल्लक असल्याचे बाविस्कर म्हणाले.

मी डाव्यांवर का प्रहार केले?

जेएनयूमध्ये मी डाव्यांवरही प्रहार केले. त्याचे कारणही समजून घ्यावे लागेल. जे स्वत:ला मुक्तीदायी प्रवाहाचे पाईक समजतात, त्यांनी भारतीय परंपरेतील तुकोबा, महात्मा फुले, कबीर, शाहू महाराज या मुक्तीदायी तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष केले कारण ते त्यांच्या जातीचे नव्हते आणि युरोप तसेच इतर देशातील मुक्तीदात्यांचा पुरस्कार केला. आज भारतीय लोकांना हे मुक्तीदाते विदेशी वाटतात. त्यांनी केलेले निदान माझ्या सांस्कृतिक हितसंबंधाआड येत असल्यानेच मी डाव्यांवर झोड उठविल्याचे स्पष्टीकरण डॉ. बाविस्कर यांनी दिले.

टॅग्स :Socialसामाजिकliteratureसाहित्य