वाघाच्या हल्ल्यात बोर्डा शिवारात गाय ठार
By Admin | Updated: January 14, 2017 01:58 IST2017-01-14T01:58:10+5:302017-01-14T01:58:10+5:30
तालुक्यातील बोर्डा शेतशिवारात वाघाने हल्ला चढवून एका गायीला जागीच ठार केले. ही घटना गुरूवारी दुपारी

वाघाच्या हल्ल्यात बोर्डा शिवारात गाय ठार
वणी : तालुक्यातील बोर्डा शेतशिवारात वाघाने हल्ला चढवून एका गायीला जागीच ठार केले. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
मारेगाव तालुक्यातील उमरघाट (पोड) येथील शेतकरी सुदर्शन तुळशिराम टेकाम यांच्या मालकीची गाय होती. गुरूवारी दुपारी नेहमीप्रमाणे ही गाय बोर्डा शेतशिवारात चराईसाठी गेली होती. यादरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला चढविला. मृत या गायीची किंमत ५० हजार रूपये होती. याबाबत शुक्रवारी सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. मात्र वृत्त लिहीस्तोवर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला नव्हता.
वन विभागाने पंचनामा करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी आहे. गेल्या वर्षीसुद्धा बोर्डा शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात चार गायी व एका घोड्याला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर वाघाची दहशत कमी झाली होती. मात्र आता पुन्हा गायीवर वाघाने हल्ला केल्यामुळे या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
प्रवासी निवाऱ्याजवळ अतिक्रमण
वणी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक प्रवासी निवाऱ्याजवळ हॉटेल व पानटपरी चालकाने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसून त्यांना रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे.