घातपाती कारवायांवर एटीएसचा ‘वॉच’

By Admin | Updated: May 21, 2015 00:15 IST2015-05-21T00:15:42+5:302015-05-21T00:15:42+5:30

दहशतवादासारख्या देश विघातक कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या समाजद्रोही घटकांवर एटीएसचा (दहशतवाद विरोधी पथक) कायम....

ATS 'watch' on deadly operations | घातपाती कारवायांवर एटीएसचा ‘वॉच’

घातपाती कारवायांवर एटीएसचा ‘वॉच’

दोन कोटींची अद्ययावत उपकरणे : स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली एटीएस कार्यरत
रूपेश उत्तरवार यवतमाळ
दहशतवादासारख्या देश विघातक कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या समाजद्रोही घटकांवर एटीएसचा (दहशतवाद विरोधी पथक) कायम वॉच आहे. गोपनीयरीत्या काम करणाऱ्या या पथकाच्या नजरेतून अशा कारवाया सुटणाऱ्या नाहीत. अशा घातक प्रवृत्ती एटीएसच्या नजरेत असून त्यांच्या संपूर्ण हालचालीही टिपल्या जात आहेत. योग्य वेळ येताच या प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी एटीएस सज्ज झाली आहे.
एटीएस हे नाव पूर्वी केवळ दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येच ऐकायला मिळत होते. परंतु देशविघातक कारवायांचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने शासनाला प्रत्येक जिल्ह्यात हे पथक स्थापन करण्याची गरज वाटली. त्यातूनच प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एटीएस कार्यरत झाले. यवतमाळात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली एटीएस कार्यरत आहे.
एटीएसचा जनतेशी थेट कुठेही संबंध नाही. त्याचे कार्यालय कुठे आहे, तेथे कोण अधिकारी-कर्मचारी काम करतोय याची अनेक पोलिसांनाही माहिती नाही. मात्र या एटीएसचा सर्वत्र वॉच आहे. यवतमाळात थेट दहशतवादाचा संबंध नसला तरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याला एखादवेळी खतपाणी घालण्याचा प्रकार घडण्याची भीतीही नाकारता येत नाही. म्हणूनच अशा काही संशयास्पद वाटणाऱ्या प्रवृत्तींवर एटीएसचा २४ तास वॉच आहे. या प्रवृत्तीची प्रत्येक हालचाल टिपली जात आहे. एटीएसला आणखी मजबूत करण्यासाठी शासनाने यवतमाळात सुमारे दोन कोटी रुपयांची अद्यावत उपकरणे पुरविली आहे. त्याचा मोठा फायदा एटीएसला घातपाती घटकांना शोधताना होतो आहे.
एटीएसच्या दिमतीला बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच डॉग स्कॉड आहे. १०० मीटर अंतरावरून स्फोटकाची माहिती मिळविता येईल असे उपकरण एटीएसकडे आहे. कुठे बॉम्ब आढळल्यास त्याला निष्क्रीय करण्याचे तंत्रही या पथकाला अवगत आहे.
यवतमाळचे एटीएस पथक थेट मुंबईपर्यंतच्या एटीएसच्या साखळीत बांधले गेले असल्याने राज्यातील कोणत्याही दहशतवादी कृत्य व हालचालींनी या पथकाला लगेच अलर्ट मिळतो. एटीएस पथक जिल्हा पोलीस दलातील मोठी उपलब्धी मानली जात आहे.

Web Title: ATS 'watch' on deadly operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.