वल्हासा येथील युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:44 IST2021-07-28T04:44:22+5:302021-07-28T04:44:22+5:30
विलास तुकाराम आत्राम असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही वल्हासा पोड येथील रहिवासी असून याबाबत तिच्या आईने मुकुटबन ...

वल्हासा येथील युवतीवर अत्याचार
विलास तुकाराम आत्राम असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही वल्हासा पोड येथील रहिवासी असून याबाबत तिच्या आईने मुकुटबन पोलिसात सोमवारी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करून पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली. पीडित मुलगी ही २०१९ पर्यंत जुनोनी येथील आश्रम शाळेत शिकत होती. त्यानंतर ती शाळेत गेली नव्हती. परंतु शाळेत शिकत असताना सुटीच्या दिवशी सामान आणण्यासाठी जुनोनीत आली असता, आरोपीसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर आरोपी अनेक वेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले व याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी अत्याचार सहन करत होती. अखेर मुलीने घाबरून याबाबत कुटुंबीयांना सांगितले. तसेच तिच्या पोटात दुखत असल्याने वणी मधील एका खासगी दवाखान्यात दाखविले असता, ती साडेपाच महिन्याची गर्भवती असल्याचे समजते. त्यामुळे याबाबत सदर युवकाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यावरून आरोपी विलास आत्राम विरूद्ध भादंवि कलम ३७६ (२) (एन), ३७६ (१), ३७६ (ए), ५०६, ४, बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय युवराज राठोड करीत आहे.