अ‍ॅटोमिक एनर्जी कमीशनचे अध्यक्ष सिन्हा जेडीआयईटीत

By Admin | Updated: March 13, 2015 02:25 IST2015-03-13T02:25:47+5:302015-03-13T02:25:47+5:30

अ‍ॅटोमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष आणि भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईचे सचिव डॉ.आर.के. सिन्हा शुक्रवार १३ मार्च रोजी यवतमाळ येथे येत आहेत.

Atomic Energy Commission Chairman Sinha JDIT | अ‍ॅटोमिक एनर्जी कमीशनचे अध्यक्ष सिन्हा जेडीआयईटीत

अ‍ॅटोमिक एनर्जी कमीशनचे अध्यक्ष सिन्हा जेडीआयईटीत

यवतमाळ : अ‍ॅटोमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष आणि भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईचे सचिव डॉ.आर.के. सिन्हा शुक्रवार १३ मार्च रोजी यवतमाळ येथे येत आहेत. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेडीआयईटीत) होणाऱ्या ‘एनर्जी फॉर टुमॉरो’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेत ते मार्गदर्शन करतील.
या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १०.१५ वाजता डॉ. आर.के. सिन्हा यांच्या हस्ते होणार असून, त्यांचे बिजभाषण होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा उपस्थित राहतील.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायन टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.व्ही.एस.सपकाळ, एनआयटी वारंगलचे डॉ. एस.एच. सोनोवने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेत रसायन अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी, परमाणु आणि भौतिकशास्त्राचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभागी होण्याची विनंती संस्थेचे सचिव किशोर दर्डा प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Atomic Energy Commission Chairman Sinha JDIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.