शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'एटीएम'मध्ये शांतता, ऑनलाइनला पसंती; बिल भरण्यासाठी विविध माध्यमांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:09 IST

Yavatmal : ज्या एटीएममधून रोकड काढणाऱ्यांची संख्या घटली ते एटीएम होत आहे बंद

लोकमत न्यूज नेटवर्क वणी: अनेक जण रोखीचे व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस, ऑनलाइन व्यवहार करण्यास पसंती देत आहेत. गुगल-पे, पेटीएमसह अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने वणीतील एटीएममध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार नागरिक झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. त्यामुळे शहरासह गावखेड्यामध्येही ऑनलाइन व्यवहार करण्याची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. लहान-मोठी खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला रोकड न देता वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाइन भरणा केला जात आहे.

मोबाइलच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी भीम अॅप, गुगल-पे, पेटीएम, फोन-पे यांचा वापर केला जात आहे. अनेकांनी वेगवेगळे अॅप डाउनलोड करून घेतले आहेत. यूपीआय अंतर्गत येणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या खुबीने केला जात आहे. मोबाइलच्या माध्यमातून पेमेंट करणे नागरिकांना सोयीचे झाले आहे. पैसे हरविण्याची भीती नसते. शिवाय खिसेकापूंचीही भीती राहत नाही. ऑनलाइन व्यवहारामुळे बँकेतून रोकड काढणाऱ्यांची संख्या रोडावली असली तरी याचा सर्वाधिक परिणाम एटीएमवर झाला आहे. एकेकाळी रोकड काढण्यासाठी ग्राहकांनी गजबजलेल्या एटीएममध्ये सध्या शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एटीएम किंवा बँकेत जाऊन वेळेचा अपव्यय करण्याची इच्छा नागरिकांमध्ये राहिलेली नाही. ज्या एटीएममधून रोकड काढणाऱ्यांची संख्या घटली आहे, अशा ठिकाणचे एटीएम बंद केले जात आहे. 

ऑनलाइन व्यवहारामुळे बँकांची होतेय बचतडिजिटल पेमेंटमुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे बँकेत येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच बँकेला एटीएमवर प्रत्येक महिन्याला ५० ते ६० हजार रूपये खर्च करावा लागत होता. त्यात १० ते १५ हजार रुपयांप्रमाणे दुकान भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, तसेच मशीनमध्ये पैसे भरणे तसेच विजेच्या बिलावरही मोठा खर्च करावा लागत होता. आता एटीएमवर फारसा खर्च करावा लागत नसल्याने बँकांची आर्थिक बचत होताना दिसत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनyavatmal-acयवतमाळ