अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:23 IST2017-12-28T23:23:21+5:302017-12-28T23:23:34+5:30
सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसेल, तर याला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाई करण्याची घोषणा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली. शुक्रवारी रूढा, कारेगाव व अर्ली येथे जनता दरबार आयोजित केला होता.
केळापूर तालुक्यातील अर्ली, घुबडी, कारेगाव बंडल, सुकंडी, चनाखा व रूढा परिसरातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कोलाम, पारधी यांच्या रस्ता, वीज, पाणी, घरकूल, अन्न सुरक्षा, जमिनीचे पट्टे व आदिवासी ग्रामविकास विकास योजनांपासून वंचित ठेवण्यास प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे. पाठपुरावा करूनही जनतेचे एकही काम होत नसेल, तर संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला.
तहसीलदार महादेव जोरवार, गटविकास अधिकारी मधुकर घसाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, महावितरणचे उपअभियंता शेख, उपविभागीय अन्न व पुरवठा अधिकारी झाडे, विभागीय वन अधिकारी पवार, सहायक निबंधक मेश्राम यांच्यासह त्यांनी पोडावर सुविधांची पाहणी केली. तेथे ग्रामस्थांनी निवारा, पिण्याचे पाणी, वीज, घरकूल आदी समस्या मांडल्या. त्यावर आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत तोडगा काढण्याची ग्वाही तिवारी यांनी दिली.
रूढा येथे शिवारेड्डी एल्टीवार हिवरीकर यांनी आयोजित केलेल््या जनता दरबारात ७७ वर्षीय सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी नरसिंगराव कुस्केनवार यांनी ग्रामसेवक कोणतेही काम करण्यास तयार नसून प्रत्येकवेळी ग्रामविकासाच्या प्रश्नावर अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार केली.