एटीएमचा पीन विचारून २७ हजार परस्पर काढले
By Admin | Updated: April 1, 2016 02:46 IST2016-04-01T02:46:19+5:302016-04-01T02:46:19+5:30
बँकेतून व्यवस्थापक बोलतो, असा फोन करून पीन कोड विचारुन फसवणूक केल्याची घटना येथील नेहरू नगरात घडली.

एटीएमचा पीन विचारून २७ हजार परस्पर काढले
यवतमाळ : बँकेतून व्यवस्थापक बोलतो, असा फोन करून पीन कोड विचारुन फसवणूक केल्याची घटना येथील नेहरू नगरात घडली.
राहुल रमेश प्रजापती (२०) रा. नेहरूनगर याला रविवारी राकेश नामक इसमाचा मोबाईलवर फोन आला. मी आंध्र बँकेतून मॅनेजर बोलतो, तुमचे एटीएम ब्लॉक झाले आहे, ते चालू करण्यासाठी तुमचा पीक कोड नंबर सांगा, असे म्हटले. यावरून कोणताही विचार न करता राहुल प्रजापती याने आपला पीन कोड त्या इसमाला सांगितला. काही वेळाने राहुलच्या बँक खात्यातील २७ हजार ५१० रुपये परस्पर काढल्याचे त्याला आढळून आले. या प्रकरणी राहुल प्रजापती याने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी बुधवारी राकेश नामक अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत असताना आणि बँकांकडून कोणत्याही प्रकारचे पीन अथवा पासवर्ड आम्ही विचारीत नसल्याची जनजागृती होत असतानाही अशा घटना घडत आहेत. (प्रतिनिधी)