वाढोणा येथे आशा स्वयंसेविकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:28 IST2021-06-10T04:28:00+5:302021-06-10T04:28:00+5:30

वाढोणा बाजार : कोरोना योद्धा आशा स्वयंसेविकांचा वाढोणा बाजार येथे साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. जिवाची पर्वा न करता ...

Asha Swayamsevak felicitated at Wadhona | वाढोणा येथे आशा स्वयंसेविकांचा सत्कार

वाढोणा येथे आशा स्वयंसेविकांचा सत्कार

वाढोणा बाजार : कोरोना योद्धा आशा स्वयंसेविकांचा वाढोणा बाजार येथे साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. जिवाची पर्वा न करता कोविड-१९ मध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या सेविकांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. ४० सेविकांना राळेगाव तालुका पत्रकार संघाने गौरविले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू रोहनकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाढोनाबाजार येथील सरपंच जयश्री मांडवकर, माजी उपसरपंच प्रकाश पोपट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक भेंडाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन ठाकरे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशाल मासूरकर, विवेक कुमरे, शेख राजीक, आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Asha Swayamsevak felicitated at Wadhona