शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

आसेगाव देवीतील कृषिपंप चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 9:52 PM

बाभूळगाव तालुक्याच्या आसेगाव (देवी) येथील कृषिपंप चोरांच्या पाच सदस्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात या चोरीतील मोटारची विक्री करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ठळक मुद्देपाच आरोपींना अटक : सहा कृषिपंपासह शेतकी साहित्य जप्त, नऊ गुन्हे उघड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाभूळगाव तालुक्याच्या आसेगाव (देवी) येथील कृषिपंप चोरांच्या पाच सदस्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात या चोरीतील मोटारची विक्री करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.शेख साकीब शेख खालिद, प्रशांत सुरेश पुसदकर, वैभव गजानन पुसदकर, कुणाल संतोष उडाखे व सौरभ वासुदेव वाघमारे सर्व रा.आसेगाव (देवी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून व घरझडतीतून सहा सबमर्सिबल पंप व इलेक्ट्रिक मोटारी, ३२ नग पितळी स्प्रिंकलर पाईपचे नोझल, चार चाकी वाहनाचे पाच टायर डिस्कसह, गुन्ह्यात वापरलेली ओमनी कार (एम.एच.३१/सीएस-१५८१) आणि दोन मोटरसायकली (एम.एच.२९/ झेड-६८४०, एम.एच.२९/एसी-१०९८) असा तीन लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पाच आरोपींनी बाभूळगावच नव्हे तर यवतमाळ ग्रामीण व येथील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केले असून तूर्त नऊ गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. या टोळीत आणखी कोण सदस्य आहेत, त्यांनी कुणा-कुणाला चोरीतील साहित्य विकले, आणखी कुठे-कुठे गुन्हे केले याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी घेत आहेत.यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात या पाचही आरोपींना देण्यात आले. त्यांची पोलीस कोठडी मिळविण्यात येत आहे. त्यांच्याकडून जिल्हाभरातील अनेक कृषीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांनी वर्तविली आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात दोन मोटरसायकलवर युवक संशयास्पदरित्या फिरत असून विद्युत पंपांची विक्री करीत असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले असता हा प्रकार खरा होता. लगेच त्या विक्रेत्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते कृषिपंप चोरांच्या टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात भोयर यांनी या टोळीचा छडा लावला. या पोलीस पथकात सहायक फौजदार भीमराव शिरसाट, गजानन डोंगरे, सुशील झोडगेकर, सुधीर पिदुरकर, किशोर झेंडेकर, चालक विवेक पेठे या पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस