‘वायपीएस’च्या चिमुकल्यांचा कलाविष्कार
By Admin | Updated: December 31, 2016 01:09 IST2016-12-31T01:09:12+5:302016-12-31T01:09:12+5:30
ख्रिसमसनिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.

‘वायपीएस’च्या चिमुकल्यांचा कलाविष्कार
यवतमाळ : ख्रिसमसनिमित्त यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वर्ग एक ते पाचच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या कलाविष्काराने उपस्थित भारावून गेले. एवढेच नव्हे तर या विद्यार्थ्यांनी नाताळाची माहिती आपल्या भाषणातून दिली.
ख्रिसमसचा प्रचंड उत्साह या चिमुकल्यांमध्ये दिसून येत होता. सांता क्लॉज बनून आलेले विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. ‘झिंगल बेल... झिंगल बेल’ या गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. या नृत्याला उपस्थितांमधून प्रचंड दाद मिळाली. याशिवाय इतर गीतांवर सादर झालेल्या नृत्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नाताळविषयीची माहिती आपल्या भाषणातून दिली. ख्रिसमसचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. यवतमाळ पब्लिक स्कूलतर्फे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा येतो. याचाही अनुभव नाताळ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणातून स्पष्टपणे दिसून आला. संचालन नीलिम शर्मा यांनी केले. नृत्यासाठी प्रीती लाखकर आदींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्रभारी प्राचार्य अर्चना कढव, समन्वयक रुक्साना बॉम्बेवाला, निशा जोशी आदींनी आयोजक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)