‘यवतमाळ फेस्टिवल’मध्ये कलागुणांची उधळण

By Admin | Updated: October 10, 2016 01:54 IST2016-10-10T01:54:04+5:302016-10-10T01:54:04+5:30

यवतमाळ फेस्टिवल आयोजन समिती अंतर्गत येथील समता मैदानावर आयोजित ‘यवतमाळ फेस्टीवल-

Artificial excellence in 'Yavatmal Festival' | ‘यवतमाळ फेस्टिवल’मध्ये कलागुणांची उधळण

‘यवतमाळ फेस्टिवल’मध्ये कलागुणांची उधळण

यवतमाळ : यवतमाळ फेस्टिवल आयोजन समिती अंतर्गत येथील समता मैदानावर आयोजित ‘यवतमाळ फेस्टीवल-२०१६’ मध्ये कलावंतांनी आपल्यातील कलागुणांची उधळण केली. सुपर डान्सर अँड सिंगरमध्ये समूहनृत्य, गीतनृत्य आदी कलांचे सादरीकरण करण्यात आले.
यवतमाळ फेस्टीवल या कला महोत्सवाच्या उद्घाटनाला अभिनेत्री पूजा तायडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती. उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ‘बाणाई’चे अध्यक्ष दीपक नगराळे होते. समाज कल्याण अधिकारी जया राऊत, अशोक वानखडे, किशोर भगत, डॉ. रजनी कांबळे, ज्ञानेश्वर गोबरे, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, राजकुमार भितकर, स्मिता उके आदींची अतिथी म्हणून उपस्थिती होती.
फेस्टीवल समितीच्या अध्यक्ष ममता महाडोळे यांनी हा उपक्रम सर्वांसाठी सुवर्णसंधी असून मनोरंजनातून प्रबोधनाकडे जाण्याचा उत्तम मार्ग असल्याचे मत व्यक्त केले. फेस्टीवलच्या सचिव स्मिता उके म्हणाल्या, नव्या पिढीच्या कलावंतांना घडविण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रसंगी अभिनेत्री पूजा तायडे यांनी मार्गदर्शन केले. यवतमाळच्या मातीबद्दल खूप ऐकून होते. प्रत्यक्षात आल्यानंतर या मातीच्या कुशीत हरहुन्नरी कलावंत असल्याचे सांगत, यवतमाळ ही कलेची खाण असल्याचे भावोद्गार त्यांनी काढले.
सायंकाळी विविध कलांचे सादरीकरण झाले. आयोजन समितीचे संयोजक दीपक नगराळे यांनी ‘कैसे हम प्यार ने हमसे क्या क्या खेल दिखाये’ हे दर्द भरे गीत प्रस्तुत केले. आयोजन समितीच्या रचना सोनवणे, रश्मी खडसे यांनी नृत्य सादर केले. नृत्यांगण बॉईज, लाल भैरिया ग्रुप, राधा नाचेगी ग्रुप, नृत्यांगणा गर्ल्स अँड बॉईज यांनी विविधांगी कला सादर केल्या. भावना बावने यांनी नृत्य सादर केले. स्नेहल नगराळे, वंदन राऊत, आकाश तांबे, प्रशांत डेहनकर, अर्णवी बोरीकर, सई येलनारे, देवराज हलवार, रोशन लोहावे आदींनी सुरेल गीते सादर केली. विधी विश्वास अंभोरे हिने ‘राधा नाचे’ हे नृत्य प्रस्तुत केले.
उद्घाटन सत्र व सुपर डान्सर अँड सिंगर कार्यक्रमाचे संचालन अनुक्रमे अर्चना खरतडे, नीकिता तांडेकर यांनी केले. यावेळी वंदना संजय राठोड (बोथबोडन), ऋषिकेश जाधव (किन्हाळा) या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना पाहुण्यांच्या हस्ते मदत देण्यात आली. आभार जयश्री भगत, पुष्पलता वानखडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविता भोवते, मंगला दिघाडे, राखी भगत, उज्ज्वला इंगोले, लोपामुद्रा पाटील, माया गोबरे, सुनीता काळे, प्रिया वाकडे, एकता वाणी, रंजना नगराळे, प्रा. भावना भगत, प्रा. रिना पानतावणे, अंजली मेश्राम, प्रतिज्ञा कुळसंगे, वैशाली फुसे, निता दरणे, सीमा महाडोळे, सुषमा बरडे, कल्पना गोफणे, जया नरांजे, डॉ. स्मिता गवई आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Artificial excellence in 'Yavatmal Festival'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.