गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळा

By Admin | Updated: May 6, 2016 02:15 IST2016-05-06T02:15:29+5:302016-05-06T02:15:29+5:30

यवतमाळ शहर व ग्रामीण भागातील प्रॉपर्टी, शरीरासंबंधीचे गुन्हे रोखण्यासाठी क्रियाशील गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळा

Around the criminals | गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळा

गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळा

क्राईम मिटींग : पोलीस महानिरीक्षकांचे ठाणेदारांना निर्देश, वाढत्या गुन्हेगारीवर चिंता
यवतमाळ : यवतमाळ शहर व ग्रामीण भागातील प्रॉपर्टी, शरीरासंबंधीचे गुन्हे रोखण्यासाठी क्रियाशील गुन्हेगारांच्या वेळीच मुसक्या आवळा असे निर्देश अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी ठाणेदारांना दिले.
यवतमाळातील वाढत्या गुन्हेगारीची खबर थेट पोलीस महासंचालक कार्यालयापर्यंत पोहोचल्याने त्या कार्यालयाने महानिरीक्षकांना खास क्राईम मिटींगसाठी यवतमाळात पाठविले होते. त्यानुसार महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यात वाढलेले खून, खुनाचे प्रयत्न, मारहाण, महिला अत्याचार, चोऱ्या-घरफोड्या, दरोडे, वाटमाऱ्या या प्रत्येक हेडवरील गुन्ह्याचा महानिरीक्षकांनी तपास अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. मार्च महिन्यात घडलेल्या ११ खून, ११ खुनाचा प्रयत्न यावर त्यांचा अधिक भर होता. संवेदनशील जातीय तेढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले. बुधवारी रात्री मुक्कामी आलेले महानिरीक्षक गुरुवारी रात्रीपर्यंत तळ ठोकून होते. कोणत्या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्याची काय चूक झाली, त्यांनी कसा तपास करायला हवा होता यावरही बैठकीत चर्चा केली गेली. गुन्हे वाढण्यामागील नेमक्या कारणांवर त्यांनी बोट ठेवले. फिर्याद येऊनही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याची प्रकरणेही यावेळी पुढे आली. मुत्याल यांनी यावेळी ठाणेदारांना तपास आणि दोषारोपपत्राबाबत मार्गदर्शन केले. अनेक पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित गुन्ह्यांची संख्या बरीच मोठी आहे. ते वेळीच मार्गी लावण्याबाबत निर्देश देण्यात आले. डिटेक्शन आणि गुन्हेशाबितीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या.
मनुष्यबळाचाही आढावा
क्राईम मिटींगनंतर प्रकाश मुत्याल यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तळ ठोकला. यावेळी जिल्ह्यातील मनुष्यबळाची कमतरता, लिपिकवर्गीय यंत्रणेच्या कामकाजाची पद्धत, सोई-सुविधांची उपलब्धता याचाही आढावा घेतला. लिपिकवर्गीय यंत्रणेबाबतच्या तक्रारी पुढे आल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Around the criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.