उमरखेडमध्ये ‘आयजीं’चा तब्बल १८ तास तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:52 IST2017-08-26T21:52:19+5:302017-08-26T21:52:35+5:30

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी शहरात तब्बल १८ तास तळ ठोकून गणेशोत्सवाचा आढावा घेतला.

 Around 18 hours of IGIM is located in Umarkhed | उमरखेडमध्ये ‘आयजीं’चा तब्बल १८ तास तळ

उमरखेडमध्ये ‘आयजीं’चा तब्बल १८ तास तळ

ठळक मुद्देगणेशोत्सवाचा आढावा : पोलिसांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी शहरात तब्बल १८ तास तळ ठोकून गणेशोत्सवाचा आढावा घेतला.
महानिरीक्षक छगन वाकडे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उमरखेडमध्ये धडकले. आल्याआल्याच त्यांनी शहरातील गणेशोत्सवाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. रात्री जवळपास १२ वाजतापर्यंत महानिरीक्षकांनी गणपती विसर्जन मार्गाची प्रत्यक्ष पाहणीही केली. या मार्गावर रात्रीगस्त, फिक्स पॉर्इंट यांचा आढावा घेतला. विसर्जनाच्या वेळी यापैकी नेमका कुठे जादा पोलीस बंदोबस्त ठेवावा, याबाबत त्यांनी पोलीस अधिकाºयांना विविध सूचना दिल्या. विसर्जनस्थळाचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. विसर्जनाच्यावेळी नेमकी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीवर शहरात दगडफेक झाली होती. त्यात नागरिकांसह पोलीसही जखमी झाले होते. तत्कालिन ठाणेदारांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला होता. शहरात जवळपास चार ते पाच दिवस तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर जवळपास ४८ जणांना अटकही करण्यात आली होती. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गंभीर दखल घेतली होती. त्यामुळेच उमरखेड येथील गणेशोत्सवावर पोलिसांची तीक्ष्ण नजर आहे. या सर्व बाबींची दखल घेत महानिरीक्षक तब्बल १८ तास शहरात तळ ठोकून होते.

Web Title:  Around 18 hours of IGIM is located in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.