आर्णीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
By Admin | Updated: November 9, 2014 22:34 IST2014-11-09T22:34:56+5:302014-11-09T22:34:56+5:30
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हंसराज अहीर यांचा रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दूरचित्रवाहिन्यांवर हा कार्यक्रम बघितल्यानंतर आर्णीत

आर्णीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
आर्णी : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हंसराज अहीर यांचा रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दूरचित्रवाहिन्यांवर हा कार्यक्रम बघितल्यानंतर आर्णीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
हंसराज अहीर यांच्या रुपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला प्रथम तर चंद्रपूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे. महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खासदार अहीर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर आर्णी शहरातील बसस्थानक चौक, शिवनेरी चौक, शिवाजी चौक यासह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी विनोद राठोड, राजेश मादेशवार, सुमित छाजेड, नरेंद्र देशमुख, पवन राठोड, सुनील वानखडे, मोहन चांडक, मनोज भुजाडे, बाबूसिंग चव्हाण, संजय बोरकर, कल्पजित देवकर, गजानन पोदुटवार, नितीन जाधव, रऊफ बेग, रमेश बोईनवार, बाउद्दीन फानन, शौकत तंवर, जितेंद्र वानखेडे, रवी राठोड, लक्ष्मण परळीकर, जुनेद काजी, रुपेश टाक यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाकर्ते उपस्थित होते.
दिल्ली येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठीही अनेक जण रवाना झाले होते. वणी येथेही कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. (शहर प्रतिनिधी)