आर्णी ...... येथे नगरपरिषद स्थापन झाल्यापासून पाणीपुरवठा योजना रखडली होती. योजना व्हावी, लोकांना स्वच्छ, मुबलक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून तत्कालीन मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी योजना मंजूर करून घेतली होती. मात्र, अद्याप योजनेला हिरवी झेंडी मिळाली नव्हती. आता तब्बल ४८ कोटींची योजना मंजूर झाली आहे.
नगरपरिषदेमध्ये काॅग्रेसची एकहाती सत्ता असतानादेखील ही योजना मार्गी लागली नाही. स्रेय लाटण्यासाठी चढाओढ झाल्याने ही योजना वादात सापडली होती. शहराला त्याचा फटका बसला. योजना समोर सरकली नाही. परिणामी सामान्य जनतेला पाणी मिळाले नाही. दरम्यान अनेक घडामोडी झाल्या. मात्र, योज्ना मंज्यॅर झालीच नाही.
योजनेसाठी आत्तापर्यंत अनेकांनी पाठपुरावा केला. विद्यमान नगराध्यक्ष अर्चना अमोल मंगाम यांनीही सतत पाठपुरावा केला. माजी पालकमंत्री संजय राठोड यांनीही पाठपुरावा केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरोत्थान महाभियानमधून शहरात पाणीपुरवठा प्रकल्पास मंगळवारी मंजुरी देण्यात आली. ४८ कोटी ३२ लाखांची ही योजना मंजूर झाली. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.
योजनेसाठी सगळे नगरसेवक एकत्र आले. तीच भावना कायम ठेवणे गरजेचे आहे, अशी सामान्य लोकांची इच्छा आहे. योजना मार्गी लागल्याने शहरात आनंद व्यक्त केला जात आहे.
Web Title: Arni water supply scheme approved
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.