दोन उमेदवारी अर्ज

By Admin | Updated: June 25, 2015 02:36 IST2015-06-25T02:36:15+5:302015-06-25T02:36:15+5:30

येथील नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे वंदना मनोज रॉय व तिवारी गटातर्फे श्रद्धा अनिलकुमार तिवारी .....

Application for two candidatures | दोन उमेदवारी अर्ज

दोन उमेदवारी अर्ज

नगरपरिषद : ३0 जूनला होणार निवड
पांढरकवडा : येथील नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे वंदना मनोज रॉय व तिवारी गटातर्फे श्रद्धा अनिलकुमार तिवारी यांनी बुधवारी अर्ज दाखल केले. येत्या ३० जूनला ही निवडणूक होणार आहे.
विद्यमान नगराध्यक्ष शंकर बडे यांचा कार्यकाळ येत्या ३० जूनला संपुष्टात येत आहे. त्यामुळे नवीन नगराध्यक्षासाठी ही निवडणूक होत आहे़ पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे़ नवीन नगराध्यक्षपद कोणत्या महिलेकडे जाते, याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता होती़ १९ सदस्यीय नगरपरिषदेत काँग्रेस-पारवेकर गटाचे १५ सदस्य असल्यामुळे अध्यक्ष काँग्रेसचा व उपाध्यक्ष पारवेकर गटाचाच होईल, यात शंका नव्हती़ मात्र अध्यक्षपदासाठी वंदना रॉय व पूजा भोयर यांच्यात चुरस निर्माण झाली होती़ त्यामुळे कुणाची वर्णी लागते, याबाबत संभ्रम होता़ दोघीही प्रबळ दावेदार होत्या़ अखेर नगराध्यक्ष बडे यांनी मंगळवारी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलाविली़ त्यात पूजा भोयर व वंदना रॉय यांना प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे अध्यक्षपद देण्याचा पर्याय समोर आला़ हा पर्याय सर्वांनी मान्य केला़ तथापि सुरुवातीचे सव्वा वर्षं अध्यक्षपद कुणाला द्यायचे, याबाबत बरीच खलबते झाली़ अखेर बुधवारी वंदना रॉय यांना बडे यांनी उमेदवारी अर्ज भरावयास लावला़ त्यांनी दुपारी १ वाजता उमेदवारी अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक गराटे यांच्याकडे दाखल केला़ यावेळी विद्यमान नगराध्यक्ष बडे यांच्यासह काँग्रेस व पारवेकर गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते़ रॉय यांनी उमेदवारी अर्जाचे तीन संच दाखल केले. विरोधी तिवारी गटातर्फे श्रद्धा अनिलकुमार तिवारी यांनीही अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला. येत्या ३० जूनला रितसर प्रत्यक्ष मतदान होणार आहे़ काँग्रेस- पारवेकर गटाकडे १९ सदस्यांपैकी १५ सदस्य असल्यामुळे व तिवारी गटाकडे केवळ चारच सदस्य असल्याने रॉय यांची निवड निश्चित मानली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Application for two candidatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.