धूम्रपान व व्यसन टाळण्याची शपथ घेण्याचे आवाहन

By Admin | Updated: February 4, 2016 02:32 IST2016-02-04T02:32:24+5:302016-02-04T02:32:24+5:30

पहिल्या पाच मृत्यूच्या कारणात कर्करोग हा एक आहे. तंबाखू सेवन व धूम्रपान यामुळे शरीरातील सर्व अवयवामध्ये फुफ्फुस, स्तन, आतडी, स्वादुपिंड, किडनी, योनी मार्ग याचे कर्करोग होतात.

Appeal to take oath to avoid smoking and addiction | धूम्रपान व व्यसन टाळण्याची शपथ घेण्याचे आवाहन

धूम्रपान व व्यसन टाळण्याची शपथ घेण्याचे आवाहन

यवतमाळ : पहिल्या पाच मृत्यूच्या कारणात कर्करोग हा एक आहे. तंबाखू सेवन व धूम्रपान यामुळे शरीरातील सर्व अवयवामध्ये फुफ्फुस, स्तन, आतडी, स्वादुपिंड, किडनी, योनी मार्ग याचे कर्करोग होतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने तंबाखू सेवन व धूम्रपान टाळावे तसेच लहान मुले, अज्ञानी नागरिक यांना यापासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी. धोटे यांनी केले आहे.
२०१६ या नवीन वर्षात सुदृढ आरोग्य ठेवण्याचा दृष्टिकोनाने ४ फेबु्रवारी रोजी जागतिक कर्करोग दिवसानिमित्त नागरिकांनी वाईट सवयींना आळा घालण्याची शपथ घ्यावी, शाळेतील मुलांना तंबाखूचे व्यसन लागू नये याकरिता शाळेच्या १०० मीटरच्या क्षेत्रात पानठेले, तंबाखू व धूम्रपान केंद्रांना प्रतिबंध घालावा व धूम्रपान वर्जित क्षेत्रात धूम्रपान करणारे व विके्रते आढळल्यास त्यांना दंडित करण्याची मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहे.
कर्करोग निदान लवकर होण्यासाठी वैद्यकीय स्तरावर बऱ्याच प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाचे निदान करून घेणे आवश्यक आहे. मुखरोगाच्या कर्करोगासाठी दंतशल्य चिकित्सकाकडून मौखिक तपासणी सहा महिन्याच्या अंतरावर करून घ्यावी, दंतशल्य चिकित्सक सेवा सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे उपलब्ध आहे. स्थनाचा कर्करोग प्राथमिक अवस्थेत मेमोग्राफी तसेच एफएएनसी च्या चाचणीद्वारे करता येते. ही तपासणी सोनोग्राफी केंद्रावर उपलब्ध असते. कर्करोग निदानासाठी पॉप स्मिअर ही तपासणी बऱ्याच पॅथॉलॉजीमध्ये उपलब्ध आहे. शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपलब्ध आहे. सर्विकल कर्करोगासाठी लससुध्दा उपलब्ध आहे. स्त्रियांनी ही लस घेतल्यास सर्विकल कर्करोग टाळता येतो, असे डॉ.टी.जी. धोटे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Appeal to take oath to avoid smoking and addiction