बाभूळगाव काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:38 IST2018-02-18T23:37:52+5:302018-02-18T23:38:04+5:30
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व एनएसयूआयतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.

बाभूळगाव काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
ऑनलाईन लोकमत
बाभूळगाव : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व एनएसयूआयतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. प्रभारी तहसीलदार डी.पी. बदकी यांनी निवेदन स्वीकारले.
गेल्या काही वर्षांपासून शेती पिकात सातत्याने घट होत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर प्रकाशचंद छाजेड, डॉ. रमेश महानूर, श्रीकांत कापसे, प्रकाश नाकतोडे, विश्वनाथ साहू, कृष्णा ढाले, धीरज रूमाले, चंद्रशेखर परचाके, पांडुरंगजी लांडगे, राजू गायकवाड, नासीर खाँ पठाण, निखिल कडू, अभिलाष शेळके, विपूल बोबडे, राऊत, राहुल कुकडे, वृषभ गुल्हाने, पिंटू होटे, अतुल राऊत, गजानन नाईकवाड आदींच्या स्वाक्षºया आहेत.