जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा

By Admin | Updated: June 27, 2015 00:37 IST2015-06-27T00:37:58+5:302015-06-27T00:37:58+5:30

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्यावतीने पोलीस मुख्यालयातील...

Anti-Magic Law Training Workshop | जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा

जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा

यवतमाळ : जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्यावतीने पोलीस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, प्रा. शाम मानव, सहअध्यक्ष प्रवीण गांगुर्डे उपस्थित होते.
कार्यशाळेत जादूटोणा विरोधी कायद्याच्या पाचव्या कलमानुसार पोलीस निरीक्षकाची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या दर्जाच्या अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुन्हा दाखल करून घेणे, त्याचा तपास करणे, दोषारोप कोर्टात सादर करणे ही महत्वाची कामे दक्षता अधिकाऱ्याकडे राहणार आहे. या विशेष तरतूदीमुळे प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी होऊ शकेल असे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षकाने दक्षता अधिकारी म्हणून काम करताना स्वार्थासोबत परमार्थ साधण्याची संधी प्राप्त झाली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमुळे खऱ्या अर्थाने समाजहित साधता येणार आहे, असे ्रप्रा. शाम मानव यांनी सांगितले. नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ठ, अघोरी प्रथा, जादूटोणा याचा अर्थ अनुसूचीमध्ये नमूद केलेली १२ कृत्य, कलमे आहेत. अनुसूचितील १२ कमलातील वर्णन केलेल्या कृती करणे हाच गुन्हा आहे, असे अपर पोलीस अधीक्षक डोळे यांनी सांगितले.
जादूटोणा विरोधी संपूर्ण कायद्यातील १२ कलमे आणि मागील एकूण ३४ वर्षातील बुआबाजी, मांत्रिक, तांत्रिक यांचा भांडाफोड केल्यास केसेस विषद करून चमत्कार अशा कृती प्रात्यक्षिकासह त्यातील फसवेगिरी साध्या आणि सरळ
भाषेत समजावून कायद्याचे
प्रशिक्षण व मार्गदर्शन शाम मानव यांनी केले.
कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे व्यवस्थापन पोलीस उप अधीक्षक पी.डी. डोंगरदिवे यांनी केले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)

Web Title: Anti-Magic Law Training Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.