टिपेश्वरमध्ये निसर्गप्रेमींची वनभ्रमंती
By Admin | Updated: February 15, 2016 02:40 IST2016-02-15T02:39:37+5:302016-02-15T02:40:59+5:30
जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वनसंपदेची विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढली आहे.

टिपेश्वरमध्ये निसर्गप्रेमींची वनभ्रमंती
यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वनसंपदेची विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढली आहे. येथील कोब्रा अॅडव्हेंचर अॅन्ड नेचर क्लबच्यावतीने ७ फेब्रुवारीला निसर्गप्रेमींनी टिपेश्वर अभयारण्याला भेट देवून वन भ्रमंतीचा आनंद लुटला.
टिपेश्वर अभयारण्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध गोसावी डोह, पिलखान, सुसरी पॉर्इंट, हापसी पॉर्इंट, सावरगाव आदी ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. या दरम्यान चितळ, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा, मोर यांचे दर्शन झाले. पिलखान भागात स्वर्गीय नर्तक, व्हाईट आय बझार्ड आदी विविध प्रजातींच्या पक्षांचे दर्शन झाले. टिपेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी गजेय लांबाडे यांनी निसर्गप्रेमींना जंगलाचे महत्त्व सांगितले. तसेच चारोळी, येन, मोह, बेहाडा, आवळा, धावडा, लेंडी, हिवर या झाडांबद्दल वनरक्षक विश्वास राजगडे यांनी माहिती दिली. भाऊराव बाकमवार यांनी वनाविषयी माहिती सांगितली.
आयोजनासाठी आकाश पसले, दिवाकर तिरमारे, यशवंता टिपले, अभिजित मुडे, विशाल बावने, राहुल दाभाडकर, जन्मजय वाघमारे यांनी परिश्रम घेतले. एकूण २२ निसर्गप्रेमी यात सहभागी झाले होते, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)