शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

नेरमधील १४२ सार्वजनिक नळ वसुलीसाठी ऐन उन्हाळ्यात बंद

By admin | Updated: May 9, 2014 01:20 IST

नगरपरिषदेच्या हद्दीतील १४२ सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर हे कनेक्शन बंद केल्याने नगरपरिषदेमध्ये पाणी पेटले आहे.

नेर : नगरपरिषदेच्या हद्दीतील १४२ सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर हे कनेक्शन बंद केल्याने नगरपरिषदेमध्ये पाणी पेटले आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी मात्र हा शासनाचा आदेश असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याची माहिती दिली. नेर-नबाबपूर नगरपरिषदेमध्ये शासनाच्या सुजल निर्माण अभियान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. सदर योजनेमध्ये नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक नळ थांबे बंद करण्यात येईल, असे नगरपरिषदेने राज्य शासनासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे व शासनस्तरावरील सभेमध्ये ऊहापोह करण्यात आला. नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक नळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी १४२ सार्वजनिक नळ १ मार्च २0१४ पासून बंद करण्यात आले. याची माहिती रिक्षावरून जनतेला देण्यात आल्याचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी सांगितले. ज्या ठिकाणावरील सार्वजनिक नळ काढले तेथील जनतेला सवलतीच्या दरात ४00 नळकनेक्शन देण्यात आले. त्यामुळे नगरपरिषदेच्या वार्षिक उत्पन्नात चार लाख रुपये वाढ झाली व मालमत्ता कराची ही वसुली झाल्याचे सांगण्यात येते. या मोहिमेंतर्गत १0 अवैध नळ जोडणी करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नगरपरिषदेने शहराला स्टॅन्डपोस्ट मुक्त केले आहे. मात्र नगरपरिषदेला हे शहानपण उन्हाळ्याच्या तोंडावरच का सुचले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला सवलतीत नळयोजना देवून १४२ सार्वजनिक नळ नगरपरिषदेला बंद करता आले असते. मात्र या बाबी नगरपरिषदेने विचारात घेतल्या नाही व नळ बंद करून वसुलीचा सपाटा सुरूकेला आहे. यामुळे जनतेत संतापाची लाट पसरली आहे. या प्रश्नावरून सध्या नेर नगरपरिषदेचे राजकारण तापले आहे. काँग्रेसच्या नगरसेविका प्रतिभा बगमारे यांनी ही नगरपरिषदेची मनमानी असल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. एकीकडे नळकनेक्शन बंद करणे व दुसरीकडे वसुलीचा सपाटा लावणे यामुळे नगरपरिषदेपुढे विचित्र पेच निर्माण झाला असून त्यांना विरोधक व जनतेच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)