अंकिता बनली आरएफओ

By Admin | Updated: June 26, 2016 02:23 IST2016-06-26T02:23:51+5:302016-06-26T02:23:51+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत येथील अंकिता नरेश तेलंग हिने यश मिळविले.

Ankita became RFO | अंकिता बनली आरएफओ

अंकिता बनली आरएफओ

वणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत येथील अंकिता नरेश तेलंग हिने यश मिळविले. तिची वनक्षेत्रपाल गट (ब) (आरएफओ) या राजपत्रित पदावर निवड झाली आहे.
तिचे नियुक्तीपूर्व १८ महिन्याचे प्रशिक्षण केंद्रीय अकादमी राज्य वनसेवा आर.एस. पुरम कोर्इंबतुर (तामीळनाडू) येथे १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अंकिताने स्वत:च्या परीश्रमातून कोणत्याही प्रकारची शिकवणी वर्ग न लावता अभ्यास करून हे यश संपादन केले. अंकिताचे आईवडील येथील पंचायत समिती अंतर्गत शिक्षक आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Ankita became RFO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.